व्ही. अरुणाचलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

व्ही. अरुणाचलम उपाख्य अलादी अरुणा (जुलै ९,इ.स. १९३३-डिसेंबर ३१,इ.स. २००४) हे भारत देशातील राजकारणी होते.

ते इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे उमेदवार म्हणून तमिळनाडू विधानसभेवर निवडून गेले.पक्षाचे ज्येष्ठ नेते एम.जी. रामचंद्रन हे तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे इ.स. १९७३ मध्ये पक्षाबाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष स्थापन केला.त्यांच्या बरोबर व्ही.अरूणाचलम यांनीही द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षातून बाहेर पडून अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षात प्रवेश केला.पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते तमिळनाडू राज्यातील तिरुनलवेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे इ.स. १९८४ मध्ये ते तमिळनाडू राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले. ते बोफोर्स प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य होते. एम.जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांनी पुन्हा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षात प्रवेश केला.इ.स. १९९६ ते इ.स. २००१ या काळात ते एम. करुणानिधी सरकारमध्ये कायदेमंत्री होते.

पक्षाच्या नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यामुळे त्यांना इ.स. २००४ मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षातून काढण्यात आले.डिसेंबर ३१,इ.स. २००४ रोजी ते सकाळी फिरायला गेलेले असताना त्यांची तिरुनलवेली जिल्ह्यातील अलांगुलम या ठिकाणी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.