व्हिटनी ह्युस्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
व्हिटनी ह्युस्टन (इ.स. २००९)

व्हिटनी एलिझाबेथ ह्युस्टन (इंग्लिश: Whitney Elizabeth Houston) (९ ऑगस्ट, इ.स. १९६३ - ११ फेब्रुवारी, इ.स. २०१२) ही अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप गायिका होती. हिने आपल्या गायनाने इ.स.चे १९८०चे दशक गाजविले. गायक असलेल्या पालकांच्या संगतीत व्हिटनी वयाच्या अकराव्या वर्षापासून गायला लागली. तिने गाण्याचा पहिला कार्यक्रमही त्याच वर्षी सादर केला. तिची "सेव्हिंग ऑल माय लव्ह फॉर यू" आणि "आय वॉना डान्स विथ समबडी" या गाण्यांनी रसिकांना वेड लावले.

वैवाहिक जीवन[संपादन]

बॉबी ब्राउन या गायकाशी तिचे लग्न झाले होते, परंतु त्यांचे वैवाहिक जीवन अपयशी ठरले. त्यातून व्हिटनीला नैराश्य आले व म्हणून ती अमली पदार्थांच्या आहारी गेली असे मानले जाते [ संदर्भ हवा ].

चित्रपट[संपादन]

व्हिटनी तिच्या हास्यासाठी प्रसिद्ध होती. त्यामुळे तिला चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली. इ.स. १९९२ साली प्रदर्शित झालेला बॉडीगार्ड हा तिच्या कारकिर्दीतला सर्वांत यशस्वी चित्रपट होय.

पुरस्कार[संपादन]

सर्वाधिक पुरस्कार मिळवणारी गायिका म्हणून व्हिटनीचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट आहे. तिला गाण्यासाठी तब्‍बल ४१५ पुरस्कार मिळाले आहेत. तिला सहा वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाले.

मृत्यू[संपादन]

११ फेब्रुवारी, इ.स. २०१२ रोजी बेव्हर्ली हिल येथील बेव्हर्ली हिल्टन हॉटेलात व्हिटनीचा बाथटबात डोके बुडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला[ संदर्भ हवा ]. तिच्या मृत्यूचे कारण समजले नसले, तरीही त्यासंबंधी तपास चालू आहे. निधनसमयी ती ४८ वर्षाची होती.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.