वॉरेन वॉशिंग्टन
वॉरेन वॉशिंग्टन (२८ ऑगस्ट, १९३६: पोर्टलँड, ओरेगॉन, अमेरिका - ) हे अमेरिकन हवामान शास्त्रज्ञ असून ते सध्या नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फिअरिक रिसर्च, बोल्डर, कॉलोराडो येथे वयाच्या ८३ व्या वर्षीही कार्यरत आहेत.[१]
जन्म व शिक्षण
[संपादन]वॉरेन वॉशिंग्टन यांचा जन्म २८ ऑगस्ट १९३६ला अमेरिकेतील पोर्टलँड, ओरेगॉन, येथील आफ्रिकन-अमेरिकन कुटुंबात झाला. वॉशिंग्टन यांनी ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीतून भौतिकशास्त्रात पदवी व हवामानशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी मधून १९६४ साली हवामानशास्त्रात पीएच.डी मिळवली.
कार्य
[संपादन]पर्यावरण विज्ञान व हवामान संशोधन या विषयांत डॉ. वॉशिंग्टन तज्ञ आहेत व पृथ्वीचे हवामान व त्याची कॉम्प्युटर सिम्युलेशन मॉडेल्स बनवणे या विषयांत त्यांचा खास अभ्यास आहे. वॉशिंग्टन यांनी अनेक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पर्यावरण विषयक सल्लागार म्हणून काम केले आहे. टोकाच्या पर्यावरणीय घटनांचा संबंध व त्यांची वाढण्याची शक्यता वॉशिंग्टन यांची मॉडेल्स स्पष्ट करतात. हवामानशास्त्रातील हा महत्त्वाचा विकासाचा टप्पा वॉशिंग्टन यांच्या संशोधनामुळे शक्य झाला आहे.
पुरस्कार
[संपादन]वॉरेन वॉशिंग्टन यांना २००७ साली शांततेचे नोबेल पारितोषिक आयपीसीसीच्या इतर शास्त्रज्ञांबरोबर विभागून देण्यात आले. २०१० मध्ये अमेरिकेतले विज्ञान क्षेत्रातले सर्वोच्च ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ दिले गेले.[२]२०१९ मध्ये पर्यावरण क्षेत्रातील नोबेल मानला जाणारा टायलर पुरस्कार वैज्ञानिक मायकेल मॅन यांच्याबरोबर विभागून देण्यात आला.[३]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "VITA - WARREN M. WASHINGTON" (PDF). http://www.cgd.ucar.edu. १० मार्च २०२० रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ "NEW WARREN WASHINGTON MEDAL TO BE AWARDED BY AMS". https://news.ucar.edu. १० मार्च २०२० रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ "THE TYLER PRIZE FOR ENVIRONMENTAL ACHIEVEMENT 2019" (PDF). https://tylerprize.org. १० मार्च २०२० रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)