वेसेक्सचा एथेलरेड
Jump to navigation
Jump to search
वेसेक्सचा एथेलरेड पहिला (इ.स. ८३७ - एप्रिल २३, इ.स. ८७१) हा वेसेक्सच्या एथेलवुल्फचा मुलगा होता. तो आपल्या भाऊ, वेसेक्सचा एथेलबर्टच्या, मृत्यूनंतर वेसेक्सच्या राजेपदी आला. त्याच्या राज्यकालात डेन्मार्कच्या सैन्याने वेसेक्स व ईंग्लंडवर आक्रमण करून धुमाकूळ घातला. जानेवारी ४, इ.स. ८७१ला रीडिंगच्या लढाईत हार पत्करल्यावर एप्रिल २३ला मर्टोनच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला.
त्याच्यानंतर त्याचा लहान भाऊ आल्फ्रेडने राज्य सांभाळले. एथेलरेडला दोन मुले, एथेलवाल्ड व एथेलहेम, होती.