Jump to content

वुर्झबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वुर्झबर्ग मध्यवर्ती भाग आणि नगरपालिका

वुर्झबर्ग हे जर्मनीच्या उत्तर बव्हारियामधील फ्रँकोनिया प्रदेशातील शहर आहे. फ्रांकफुर्ट आणि न्युर्नबर्गच्या साधारण मध्यावर असलेले हे शहर माइन नदीवर आहे. २०१३ च्या शेवटी येथील लोकसंख्या १,२४,६९८ होती.

हे शहर लँडक्रीस वुर्झबर्गचे प्रशासकीय केन्द्र असले तरी ते त्याचा भाग नाही.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान १६ मार्च, इ.स. १९४५ रोजी रॉयल एर फोर्सच्या लँकेस्टर बॉम्बफेकी विमानांनी या शहरावर तुफान अग्निवर्षाव करून शहर बेचिराख करून टाकले. १७ मिनिटांमध्ये २२५ विमानांच्या सतत हल्ल्यांमध्ये ५,००० पेक्षा जास्त व्यक्ती ठार झाल्या व अनेक शतकांपूर्वी बांधलेली चर्च, कॅथेड्रल, घरे मातीत मिळाली. ३ एप्रिल, १९४५ रोजी अमेरिकेच्या १२व्या चिलखती दलाने आणि ४२व्या पायदळाने शहरावर एल्गार करून ५ एप्रिलला त्यावर नियंत्रण मिळवले.

येथे असलेले वुर्झबर्ग विद्यापीठ जर्मनीतील सगळ्यांत जुन्या विद्यापीठांपैकी एक असून याची स्थापना १४०२मध्ये झाली होती.