युनिव्हर्सिटी ऑफ वुर्झबर्ग
Appearance
(वुर्झबर्ग विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
वुर्झबर्ग विद्यापीठ तथा जुलियस मॅक्सिमिलियन वुर्झबर्ग विद्यापीठ हे जर्मनीच्या वुर्झबर्ग शहरातील उच्चशिक्षण संस्था आहे. १४०२मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ जर्मनीच्या सगळ्यांत जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. याला जुलियस एक्टर फोन मेस्पेलब्रुन आणि मॅक्सिमिलनयन जोसेफ यांचे नाव दिलेले आहे.
या विद्यापीठात संशोधन करणाऱ्या अनेक संशोधकांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे -
- १९०१ - विल्हेम कॉनराड रॉन्टजेन (भौतिकशास्त्र)
- १९०२ - हेर्मान एमिल फिशर (रसायनशास्त्र)
- १९०७ - एडुआर्ड बुखनर (रसायनशास्त्र)
- १९११ - विल्हेम वीन (भौतिकशास्त्र)
- १९१९ - योहानेस श्टार्क (भौतिकशास्त्र)
- १९३५ - हान्स स्पेमान (वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक)
- १९८५ - क्लाउस फोन क्लिट्झिंग (भौतिकशास्त्र)
- १९८८ - हार्टमुट मिशेल (रसायनशास्त्र)
- २००८ - हॅराल्ड झुर हासेन (वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक)