Jump to content

विहीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कीनिगस्टीन गढीतील विहीर जर्मनी
कास गावातील प्राचीन पायऱ्यांची विहीर. चित्रात एक दरवाजाची चौकट दिसत आहे. हवे तेंव्हा यातील पाणी घेणे बंद अथवा सुरू करता येऊ शकते अशी ही सोय आहे.
वरून दिसणारे दृश्य
पायऱ्या

जमीनीखालील पाणी काढण्यासाठी केलेल्या खड्ड्यावजा बांधकामास विहीर असे म्हणतात. विहिरीतील पाणी विद्युत् उपकरण वा मनुष्यबळ लावून काढले जाते आणि घरगुती वापरासाठी तसेच सिंचनासाठी वापरले जाते. विहिरीचे अन्य प्रयोग विश्व मध्ये काही जागी पेट्रोल आणि गैस विहीरी पण आहेत.येथे ज़मीनीची खुदाई करून कई लाख क्यूबिक मीटर गैसचे प्रतिदिन उत्पादन केले जाते.

इन्हें भी देखें

कार्य

[संपादन]

भुपृष्ठाखाली असलेल्या पाण्याच्या पातळीपर्यंत पोचून पाणी उपलब्ध करणे. विहिरीचे अन्य प्रयोग विश्व मध्ये काही ठिकाणी पेट्रोल आणि गैस-विहिरी पण आहेत. येथे ज़मीनीतील खुदाई काम पूर्ण करून अनेक लाख क्यूबिक मीटर गैसचे प्रतिदिन उत्पादन केले जाते.

रचना

[संपादन]

प्रथम योग्य जागा निवडून तिथे खड्डा करतात. तो भूगर्भातील पाण्याच्या पातळीपर्यंत खोल नेतात. नंतर खड्ड्याच्या भिंतींचे दगड/विटा/काँक्रीट ने बांधकाम करतात. पाणी बाहेर काढण्यासाठी खिराडी/मोट वा विजेवर चालणाऱ्या पंपाची व्यवस्था करतात. पाणी किती साठवायचे त्यावर विहिरीची गोलाई (रुंदी) अवलंबून असते. विहिरीची रचना साधारणतः वर्तुळाकार असते.

  आधुनिक विहीर ...
  आता खूप सोप्या पद्धतीने विहीर 

बांधतात. सिमेंट चे पाईप तयार मिळतात. 3,4,5,6 फुट व्यासाचे 8 फुट लांबीचे

खोली प्रमाणे 2 किंवा 3 पाईप वापरून
योग्य खड्डा खणून जेसीबी च्या साह्याने

एकावर एक उभे करून बाजूने दगड माती टाकून बुजावतात. की झटपट विहीर तयार होते.

प्रकार

[संपादन]
  • आड (अरुंद, खोल आणि बहुधा चौकोनी विहीर)
  • कूप (अरुंद आणि खोल विहीर)
  • गोल विहीर
  • चौकोनी विहीर
  • दीर्घिका (लांबट विहीर)
  • नलिका कूप
  • पुष्करणी
  • बारव - मोठी विहीर
  • भुडकी - जिच्यात बहुधा पाणी टाकावे लागते, अशी नदीकाठी असलेली विहीर. अशी एक विहीर पुण्यातील वर्तक बागेत आहे.
  • मोटांची विहीर
  • वापी - पायऱ्या असलेली विहीर
  • वाव
  • हौद


नळकूप (ट्यूबवेल्ल) शब्द स्वयं स्पष्ट करतो की नळाद्वारे एक कूपाचे सृजन केलेले असते. यात धातुच्या नळाला जमीनीत खोलवर घेऊन जातात की तो जलस्तरापर्यंत पोहचतो. याप्रकारे नळकूपाचे निर्माण होते. नळकूपा़वर मशीन-चालित पम्प लाऊन त्यातून पाणी काढले जाते आणि ते पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरले जाते.

पहा : बारामोटेची विहीर

संस्कृती व साहित्यातील झलक

[संपादन]
विहिरीवरील स्त्री, पॉल सिगनॅक याचे तैलचित्र १८९२