विष्णु माधव घाटगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विष्णू माधव घाटगे या पानावरून पुनर्निर्देशित)
विष्णू माधव घाटगे
Vishnu Madav Ghatage

जन्म २४ ऑक्टोबर, १८६१
हसूरचंपू, कोल्हापूर राज्य, ब्रिटिश राज (सध्या महाराष्ट्र)
मृत्यू ६ डिसेंबर, १९९१
बेंगळुरू, कर्नाटक, भारत
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र वैमानिक अभियंता
कार्यसंस्था हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
ख्याती एरोनॉटिकल अभियांत्रिकी (Aeronautical engineering)
पुरस्कार पद्मश्री

विष्णू माधव घाटगे (२४ ऑक्टोबर १९०८ - ६ डिसेंबर १९९१) जर्मनीतील कैसर विल्यम संस्थेमध्ये त्यांचे शिक्षण झाले. विमानशास्त्र यंत्रविद्या या विषयाचे प्राध्यापक म्हणून भारतीय विज्ञान संस्था बंगलोर येथे नौकरी केली (१९४२-४७) नंतर बंगलोर येथील हिंदुस्तान एरोनॅटिक्स लिमिटेडचे उपप्रमुख म्हणून काम केले. त्यांनी HAL HT-2 ह्या विमानाचा आराखडा व निर्मिती करणाऱ्या संघाचे नेतृत्व केले, पहिले भारतीय डिझाईन केलेले आणि तयार केलेले विमान. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल १९६५ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

विष्णू माधव घाटगे यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९०८ रोजी कोल्हापूर संस्थानातील हसूरचंपू या छोट्याशा गावात झाला.[१]

  1. ^ "घाटगे, विष्णु माधव". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-02-23 रोजी पाहिले.