Jump to content

विष्णु गणेश पिंगळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विष्णू गणेश पिंगळे या पानावरून पुनर्निर्देशित)
विष्णू गणेश पिंगळे

विष्णू गणेश पिंगळे (२ जानेवारी, १८८९:तळेगांव ढमढेरे, - १६ नोव्हेंबर, १९१५:लाहोर) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांनी लाला हरदयाळ, पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्यासोबत गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती.

विष्णू पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगांव ढमढेरे या गावचे राहणारे असून इ.स. १९११ साली अमेरिकेतून इंजिनीयर झाले होते. देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉनकॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. रासबिहारी बोस, विष्णू पिंगळे, कर्तारसिंह सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ रोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि विष्णू पिंगळे सहित ८ क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात फासावर चढले.

दि.१६/११/१९१५ रोजी फासावर गेलेले ८ क्रांतिकारक

[संपादन]
  1. विष्णू गणेश पिंगळे
  2. कर्तारसिंह सराबा
  3. सरदार बक्षीससिंह
  4. सरदार जगनसिंह
  5. सरदार सुरायणसिंह
  6. सरदार बुटासिंह
  7. सरदार ईश्वरसिंह
  8. सरदार हरनामसिंह

पुस्तक

[संपादन]

विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या तेजस्वी तारे या पुस्तकात दहा क्रांतिकारकांची ओळख करून दिली आहॆ, त्यांत विष्णू गणेश पिंगळे यांचा समावेश आहे.