विष्णु वाघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विष्णू सूर्या वाघ (जन्म : तिसवाडी-गोवा-भारत, २४ जुलै १९५४; - केपटाऊन, दक्षिण आफ्रिका, ८ फेब्रुवारी २०१९) हे गोव्यातील कवी, नाटककार होते, आणि २०१२ ते २०१७ या काळात ते गोवा विधानसभेचे आमदार व नंतर उपसभापती होते.[१]

साहित्य क्षेत्रासह संगीत, नाट्य, चित्र, व्यंगचित्र, शिल्प, वक्ता आदी कलांमध्ये प्रभुत्व असणारे विष्णू वाघ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. मराठी राजभाषा व्हावी, यासाठी केलेल्या अनेक आंदोलनांत ते सतत अग्रभागी होते. त्यांचे अनेक कवितासंग्रह, नाटके, एकांकिका गोव्यासह देशभर गाजल्या. साहित्यिक म्हणून सिद्धहस्त असतानाच राजकीय क्षेत्रातही त्यांनी विशेष ठसा उमटवला होता. साहित्य असो वा राजकारण, त्यांनी नेहमीच अन्यायाविरोधात प्रखर लढा दिला. शोषितांचे कैवारी अशीही प्रसिद्धी त्यांना लाभली होती.[२]

शिक्षण[संपादन]

१०वीच्या परीक्षेच्या निकालात त्यांचे नाव गुणवत्ता यादीत होते. त्यावेळी ते वास्कोमध्ये आपल्या मावशीकडे राहात. त्यांनी वास्कोच्या एम.ई.एस. काॅलेजात विज्ञान विषयातील पदवीसाठी प्रवेश घेतला. तेथे असताना ते त्यांच्या प्राध्यापकांच्या उत्तेजनामुळे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. वास्कोच्या स्थानिक गंथालयामध्ये त्यांची अनेक साहित्यिकांशी आणि कलावंतांशी मैत्री झाली. ते एकांकिका आणि नाटके लिहू आणि दिग्दर्शित करू लागले. पण शेवटी ते ढेंपे काॅलेजातून रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले. काॅलेजात असताना त्यांनी नंदकुमार कामत यांच्या सल्ल्यानुसार विद्यार्थी चळवळीत भाग घेतला. गोवा विद्यापीठातून बायोकेमिस्स्ट्री विषयात एम.एस्‌सी.साठी त्यांनी प्रवेश घेतला, पण वडिलांच्या १९८७साली झालेल्या निधनानंतर त्यांनी काॅलेजच्या दुसऱ्या वर्षीच सायन्सचा अभ्यासक्रम सोडून पत्रकारितेसाठी प्रवेश घेतला.[३]

विष्णू सूर्या वाघ यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • आदित्यचक्षू
 • विष्णू सूर्या वाघ यांनी केसरबाईंचे ’एका सूरश्रीची कथा’ नावाचे चरित्र लिहिले आहे. तर त्यांच्या बंधूंनी "सूरश्री " हे चरित्र लिहिले आहे.
 • विष्णू वाघ यांच्या कवितांचा 'झिंझिर झिंझिर सांज' नावाचा कवितासंग्रह व संगीत आल्बम आहे. त्यातील कवितांना बाळकृष्ण मराठे यांनी संगीतबद्ध केले आहे.
 • तीन पैशाचो तियात्र
 • ती बाई मीच आहे
 • तुका अभंग अभंग
 • नचिकेतास
 • पर्जन्यधून
 • रक्तपर्जन्य
 • लोकोपनिषदे
 • वाघनखे
 • शब्दकुंड
 • सुशेगाद

कौटुंबिक[संपादन]

शर्मिला राव या वाघ यांच्या पहिल्या पत्नी आणि अरुणा चोडणकर-वाघ या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत. वाघ यांना प्रत्येकीपासून दोन-दोन अपत्ये आहेत.

कलंक आणि आरोप[संपादन]

 • सन १९९० च्या आसपास वाघ यांच्या 'तुका अभंग अभंग' या नाटकाद्वारे त्यांनी आळंदीच्या ब्राह्मणांनी संत तुकारामाचा खून केला असे प्रदर्शित केले. त्यामुळे जनतेत खळवळ उडून वाघ यांच्यावर टीकेचा प्रचंड भडिमार झाला. त्यांना हा आरोप सिद्ध करता आला नाही.
 • २०१७ साली ऑगस्ट महिन्यात वाघ यांव्या 'सुधीर सूक्त' या कवितासंग्रहाला गोवा ॲकॅडमीने पुरस्कार जाहीर केला. या संग्रहात अनेक आक्षेपार्ह कविता असल्याने जनतेमध्ये या पुरस्काराविरुद्ध फार मोठा क्षोभ निर्माण झाला. ऑक्टोबर २०१७मध्ये गोवा सरकारने ३२ पुरस्कार रद्द केले, त्यांमध्ये वाघ यांच्या पुरस्काराचा समावेश होता. .
 • गोव्यामधील ऑडा व्हेगास (Auda Viegas) या स्त्री-चळवळकर्तीने वाघ यांच्या पुस्तकातल्या स्त्रियांसंबंधीच्या असभ्य व अनुदार लिखाणाबद्दल आक्षेप घेतल्यानेकाय आक्षेप? वाघ आणि त्यांचे प्रकाशक-हेमा नाईक चालवत असलेले अपूर्वाई प्रकाशन- यांच्यावर खटला भरला गेला. वाघ यांचा एक पुरस्कारही परत घेतला गेला. विष्णू वाघ पुढे भारतीय जनता पक्षात गेले. त्या पक्षाने सरकार बनवल्यावर वाघ यांना निर्दोष ठरवले.

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

 • पणजीच्या गोवा कला अकादमीचे अध्यक्षपद
 • Entertainment Society of Goaचे उपाध्यक्षपद
 • गोवा नाट्यसंमेलनाचे तसेच युवा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद
 • गोमंतक या दैनिकाचे संपादकत्व
 • जागतिक मराठी अकादमीचे कार्यकारी सभासद, वगैरे.
 • बाकीबाब बोरकर पुरस्कार (२००३)
 • भैरूरतन दमाणी पुरस्कार (सोलापूर)
 • यशवंतराव चव्हाण पुरस्कार (पुणे)
 • पुणे फेस्टिव्हल पुरस्कार
 • धनंजय कीर पुरस्कार (मुंबई)
 • अनेक कला अकादमी पुरस्कार
 • गोमंतक विद्या निकेतन पुरस्कार
 • गोमंतक मराठी अकादमी पुरस्कार
 • गोवारत्न पुरस्कार
 • विद्यावाचस्पती पुरस्कार
 • युवा चेतना पुरस्कार
 • आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार
 • आरती प्रभू पुरस्कार

संदर्भ[संपादन]

 1. ^ Feb 17, TNN |; 2019; Ist, 09:02. "Family, friends, fans to bid Vishnu Surya Wagh adieu today | Goa News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-07-03 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
 2. ^ D’Mello, Pamela. "In Goa, a BJP MLA's book of poems has stirred up deep-rooted caste and language rivalries". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2020-07-03 रोजी पाहिले.
 3. ^ "In picture-postcard Goa, Wagh's Dalit poetry challenges upper-castes". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-10-19. 2020-07-03 रोजी पाहिले.