विष्णुकवी
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
विष्णूकवी किंवा विष्णूदास(१८४४ सातारा-मृत्यू:सन १९१७ (१९१८?)) हे एक रेणुकादेवीचे भक्त होते. त्यांचे पूर्ण नाव श्रीकृष्ण श्रीधर (रावजी) धांधरफळे असे होते. धांधरफळ हे संगमनेर तलुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे. परंतु, त्यांचे पूर्वज साताऱ्याला स्थायिक झाले होते.[१]
इतिहास[संपादन]
त्यांची मौंज त्यांचे वयाचे सातव्या वर्षी करण्यात आली.त्यांचे लग्न १२व्या वर्षीच झाले.त्यांच्या पत्नीचे नाव राधाबाई असे होते.त्यांना अठराव्या वर्षी विरक्ती आली. ते नंतर हम्पी कर्नाटकातील शंकराचार्यांच्या मठात सुमारे वर्षभर होते. नंतर त्यांनी बासर येथे राहून सरस्वतीची उपासना केली. ते शके १७८६मध्ये माहूरयेथे वास्तव्यास आले.[१]
माहूर येथील मातृतीर्थाजवळ डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी तपश्चर्या केली.
त्यांनी रेणुकामातेच्या स्तुतिपर अनेक अभंग, काव्ये, भजने रचिल्या तसेच,लावण्या व एक नाटकदेखिल रचले. ते सन १९१७ मध्ये पौष शुद्ध अष्टमीला वयाचे ७३वे वर्षी निधन पावले.[१]
सन १९१८ मध्ये ते समाधिस्थ झाले.(?)[ संदर्भ हवा ]}