विशेष व्यक्तींचे साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साहित्य आणि सांस्कृतिक मंडळातर्फे कला, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात कार्यरत असलेल्या विशेष व्यक्तींचे साहित्य संमेलन १४ - १५ फेब्रुवारी २०१५ या काळात आळंदी येथे होणार आहे. अंध-अपंग, मूक-बधिर अशा दहा टक्क्य़ांहून अधिक लोकसंख्येतील सृजनशीलतेला व्यासपीठ देण्याच्या उद्देशातून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दिल्ली येथील ज्येष्ठ अपंग साहित्यिक डॉ. प्रेमसिंग या संमेलनाचे अध्यक्ष असतील.

निमंत्रितांचे कविसंमेलन, मूक-बधिर व्यक्तींच्या मुलाखतींचा समावेश असलेले 'होय! मलाही बोलायचयं!', संमेलनामध्ये प्रकाशित होणार्‍या साहित्याच्या लेखक आणि प्रकाशकांचे मनोगत, 'आधुनिकीकरण : साहित्य निर्मिती आणि संवर्धन' या विषयावर परिसंवाद, विशेष व्यक्तींच्या मुलाखतींचा समावेश असलेले 'यशोगाथा', 'अपंगत्व-पालकत्व', 'अपंगांची विशेष भाषा आणि ब्रेल लिपी', 'अपंगांचे साहित्य आणि प्रसार माध्यमांची भूमिका' या विषयांवर चर्चासत्र होणार आहेत.


पहा : साहित्य संमेलने