"अवेस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Pywikibot 3.0-dev)
या भाषांतरामुळे [[यूरोप]]मध्ये खळबळ उडून गेली. पुष्कळ लोकांनी डू पेराने मिळवलेल्या ग्रंथाच्या खोटेपणाबद्दल शंका प्रदर्शित केली. यामध्ये सर जोन्स हा प्रमुख होता. त्याने डू पेराला मिळालेली प्रत, साफ खोटी असून त्याला पारशांशी चकविले असे प्रतिपादन केले. त्याच्या उलट फ्रान्समध्ये डू पेराला पुष्कळ अनुयायी मिळाले व जर्मनीतील विद्वान क्लूकर याने तर या डू पेराच्या भाषांतराचे रूपांतर करून व त्यात भरपूर माहितीची भर घालून ते पुस्तक प्रसिद्ध केले.
 
इ.स. १८२५ च्या सुमारास पाश्चात्य संस्कृत पंडितांचे इकडे लक्ष्य वेधले. संस्कृत व अवेस्तन भाषेंत बरेंच साम्य आहे असे डू पेरा वगैरे विद्वानांनी सिद्ध केलेंच होते. पण रस्क नांवाच्या डॅनिश भाषाशास्त्रज्ञानें या दोन भाषांत काय साम्य आहे हें सप्रमाण दाखवून दिलें. हा पंडित स्वत:इराणमध्येंस्वतःइराणमध्यें गेला होता व तेथून त्यानें अवेस्ता ग्रंथाच्या प्रती व पहलवी भाषांतरें जमवून आणलीं. १८२६ सालीं त्यानें एक छोटासा ग्रंथ लिहून त्यांत, अवेस्तन भाषा फार प्राचीन असून तिच्यामध्यें व संस्कृतमध्यें बरेंच साम्य आहे. ती भाषा संस्कृताहून भिन्न पण, निकटसंबद्ध आहे असें सिद्ध केलें व अवेस्ता ग्रंथांतील लिपीसंबंधाचेहि त्यानें बरेच शोध केले.
 
यानंतर बर्नाफ नांवाच्या फ्रेंच पंडितानें अवेस्ताचा अभ्यास चालविला होता. डू पेराच्या भाषांतरांत बर्‍याच चुका त्याला आढळल्यामुळें त्यानें नर्योसंघाच्या संस्कृत रूपांतराच्या सहाय्यानें अवेस्ता वाचला व डू पेराच्या भाषांतरांतील पुष्कळ चुका दुरुस्त केल्या. यानंतर या दिशेनें व विशेषत: अवेस्तन लिपीसंबंधानें वॉप, हॉग, विंडीशमन, वेस्तरगार्ड, रोट, स्पीजेल इत्यादि पंडितांनीं फार प्रयत्‍न केले. या पंडितांमध्यें, अवेस्ता ग्रंथाची माहिती करून घेण्याच्या कामीं, प्राचीन टीकाग्रंथाचा व तत्कालीन इतर उल्लेखांचा आश्रय करावयाचा अगर तौलनिक भाषाशास्त्राचें साहाय्य घ्यावयाचें यासंबंधीं वाद माजला होता. पण दोन्ही साधनें सापेक्ष व परस्परसाहाय्यकारी आहेत व त्या दोहोंचाहि उपयोग करून घेणें जरूर आहे हें मत हल्लीं प्रस्थापित झालें आहे.
* मिलस-गाथाज (लिपझिग १८९२-९४);
* बोर्नाफ-वेंदांदाद सादे (पारिस १८२९-४३)
* अ‍ॅटिया-वेंदीदाद सादे (बाँबेबॉंबे १९०१)
* संजाना-नीरंगस्तान (मुंबई १८९४)
* जमस्पजी अँडॲंड हॉग-ओल्ड झंद-पहलवी ग्लॉसरी
* अ‍ॅन क्वेटिल डू पेरॉ-झेंद-अवेस्ता औव्रेजर झोरोआस्ट्रे २ व्हॉल्यूम्स, पारिस १७७१
* क्ल्यूकर-झेंद-अवेस्ता, (इंग्रजी भाषांतरकार-ब्लीक ३ भाग, लंडन १८६४)
* डॉर्मस्टेटर-झेंद-अवेस्ता (सेक्रेडबुक्स ऑफ दि ईस्ट सीरीज); जॅक्सन-अवेस्ता ग्रामर-स्टलर्ट १८९१
* कांगा-प्रॉक्टिकल ग्रामर ऑफ दि अवेस्ता लँग्वेजलॅंग्वेज (बांबे १८९१)
* संजाना-दि पहलवी व्हर्शन ऑफ दि अवेस्ता वेंदीदाद (बाँबेबॉंबे १८९५)
* भरूचा-कलेक्टेड संस्कृत रायटिंग्ज ऑफ दि पारशीज (बांबे १९०६; वेस्ट-कंटेंटस ऑफ दि नस्क; हॉग-एसेज ऑन दि पारशीज, लंडन १८८४
* ब्राऊन-लिटररी हिस्ट्रिरी ऑफ पर्शिया, लंडन १९०२
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी