"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५२: ओळ ५२:
फायदे :
फायदे :
हा चहा भूक वाढविण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, डोकेदुखी थांबविण्यासाठी उपयोगी पडतो. चहाच्या डायबेटिस विरोधी आणि अन्य चांगल्या गुणधर्मामुळे हा चहा शरीरास फारच फायदेशीर ठरतो. त्वचा सुधारण्यासाठी हा फारच उपयुक्त पडतो.बुरंश फुलांच्या हंगामात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात हा घरोघरी बनविला जातो.
हा चहा भूक वाढविण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, डोकेदुखी थांबविण्यासाठी उपयोगी पडतो. चहाच्या डायबेटिस विरोधी आणि अन्य चांगल्या गुणधर्मामुळे हा चहा शरीरास फारच फायदेशीर ठरतो. त्वचा सुधारण्यासाठी हा फारच उपयुक्त पडतो.बुरंश फुलांच्या हंगामात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात हा घरोघरी बनविला जातो.

==चहा वेळ==

चहाला कुठलीही वेळ लागत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र आणि अगदी पहाटे सुध्दा चहा प्याला जातो.
मुंबईत तर खास रात्री चहा पिण्याची ठिकाणे आहेत. दक्षिण मुंबई, दादर, परळ, घाटकोपर, बोरिवली, मालाड परिसरात ह्याचा स्वाद घ्यायला मिळतो. अनेक रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे चहावाले हमखास असतात. हल्ली मेट्रो रेल्वे बांधकाम चालू असल्याने त्या ठिकाणी शेकडो कामगार दिवसरात्र काम करीत असतात त्यांना रात्री चहा लागतो. तेथे मध्यरात्रीपासून सकाळी ४-५ वाजेपर्यंत चहा मिळतो. हे चहावाले सायकलवर चहा विकत असतात.मुंबई शहरात ही चहाविक्रीची उलाढाल एखाद कोटीपर्यंत जाते. रात्रभर चहा विक्रीत प्रत्येक चहावाला एक ते दीड हजार रुपये कमाई करतो. या रात्रीच्या मेहनतीवर अश्या विक्रेतांची घरे चालतात. मुंबई मायानगरी म्हणतात त्याचे प्रत्यंतर ह्यातच सामावलेले आहे.

==संदर्भ==
मुंबई टाईम्स ०३/०२/२०२०.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१६:५५, २७ मार्च २०२० ची आवृत्ती

हिरव्या चहाचा पेला

Tea (शास्त्रीय नाव: Camellia sinensis, कॅमेलिया सिनेन्सिस ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका  ;चिनी: 茶 , छा ; जपानी: 茶 ;) चहा हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. चहा ही संज्ञा कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजली जाते. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय उत्पादन बनवले जाते. पाण्याखालोखाल हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला छा असे संबोधतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अश्या नावांनी संबोधतात. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टे/ टी हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण चहा पिल्याने ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज असल्याचे पाहायला मिळतो.

सोलापूर शहरामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर असून आठ तास कामगार काम करत असून त्यामुळे ९० % कामगार हे चहा या पेयाला जास्त प्राधान्य देतात. सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची दुकाने दिसतील. त्यामुळे बऱ्याच दुकानामध्ये गर्दी देखील हि जास्त दिसते.

चहाचा एक कप

चहाचे प्रकार

बदाम पिस्ता चहा, बिरयानी चहा, गुलाबी चहा, ईराणी चहा, बुरंश चहा, हाजमोळा चहा, सुलेमानी / लेबु चहा.

बदाम पिस्ता चहा

अमृतसर हे बदाम पिस्ता चहासाठी फार प्रसिद्ध आहे. साहित्य: १/२ कप पाणी १ कप मलई दूध साखर २ चमचे चहा पावडर ३-४ केशर बदाम आणि पिस्ता १ चमचा २ ईलायची.

कृती : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाका. उकळी आल्यावर केशर टाका. पुन्हा उकळी काढा.एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घाला. नंतर साखर घालून पुन्हा उकळी घ्या. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला द्या.

बुरंश चहा

डेहराडून हे बुरंश चहासाठी फार प्रसिद्ध आहे. साहित्य: १ कप पाणी १ चमचा नैसर्गिकरित्या वाळवलेली बुरंश /र्होडोडेन्ड्रोन पाने १/२ चमचा ग्रीन चहा पावडर १/२ चमचा पुदिना पाने चवीनुसार मध साखर तुळशी पाने (हवी असल्यास)

कृती : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये बुरंश पाने टाका. उकळी येत असतानाच त्यामध्ये ग्रीन चहा पाने किंवा पुदिन्याची पाने टाका.उकळल्यावर मध किंवा साखर घाला.हवी असल्यास तुळशीची पाने घाला. हा चहा तुम्ही गरम किंवा थंड पिऊ शकता. सूचना : नैसर्गिकरित्या वाळवलेली बुरंश पाने शॉपिंग पोर्टलवर मिळतात. ती हवाबंद डब्यात भरून ठेवा. बुरंश किंवा रोडोडेन्ड्रोन चहा हा उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये स्वागत करताना देतात. कँफेनशिवाय दिवसाची सुरुवात करण्यासाठी अपायकारक रसायनाशिवाय असलेल्या हा सुगंधी चहा फारच छान आहे.बुरंश पाने चहाची चव वाढवतानाच त्यापासून शरीराला होणारे फायदेही देतात. हिमालयात ३५०० ते ४००० मीटर उंचीवर ही भडक तांबडी घंटेच्या आकाराची बुरंश फुले होतात. उत्तराखंड राज्याचे बुरंश झाड हे राज्यझाड आहे. शेरपा आणि तिबेटीयन लोक बुरंश झाडांना पवित्र झाड मानतात.

फायदे : हा चहा भूक वाढविण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, डोकेदुखी थांबविण्यासाठी उपयोगी पडतो. चहाच्या डायबेटिस विरोधी आणि अन्य चांगल्या गुणधर्मामुळे हा चहा शरीरास फारच फायदेशीर ठरतो. त्वचा सुधारण्यासाठी हा फारच उपयुक्त पडतो.बुरंश फुलांच्या हंगामात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात हा घरोघरी बनविला जातो.

चहा वेळ

चहाला कुठलीही वेळ लागत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र आणि अगदी पहाटे सुध्दा चहा प्याला जातो. मुंबईत तर खास रात्री चहा पिण्याची ठिकाणे आहेत. दक्षिण मुंबई, दादर, परळ, घाटकोपर, बोरिवली, मालाड परिसरात ह्याचा स्वाद घ्यायला मिळतो. अनेक रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे चहावाले हमखास असतात. हल्ली मेट्रो रेल्वे बांधकाम चालू असल्याने त्या ठिकाणी शेकडो कामगार दिवसरात्र काम करीत असतात त्यांना रात्री चहा लागतो. तेथे मध्यरात्रीपासून सकाळी ४-५ वाजेपर्यंत चहा मिळतो. हे चहावाले सायकलवर चहा विकत असतात.मुंबई शहरात ही चहाविक्रीची उलाढाल एखाद कोटीपर्यंत जाते. रात्रभर चहा विक्रीत प्रत्येक चहावाला एक ते दीड हजार रुपये कमाई करतो. या रात्रीच्या मेहनतीवर अश्या विक्रेतांची घरे चालतात. मुंबई मायानगरी म्हणतात त्याचे प्रत्यंतर ह्यातच सामावलेले आहे.

संदर्भ

मुंबई टाईम्स ०३/०२/२०२०.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत