Jump to content

"आम्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,२२० बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
वर्गीकरण
No edit summary
छो (वर्गीकरण)
आपल्या शरीरात देखील आम्ल मोठी भूमिका निभावतात. हायड्रोक्लोरिक आम्ल हे पचनात मदत करते. हे आम्ल आपल्या पोटात असते व मोठ्या रेणूंना छोट्या भागांमध्ये विभाजित करायला साहाय्य करते. ॲमिनो आम्ल हे प्रोटीन निर्मितीत लागते. प्रोटीन शरीराच्या वाढीसाठी व दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. तसेच फॅटी आम्ल पण शरीराच्या वाढीसाठी व दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. न्युक्लिक आम्ल DNA, RNA यांच्या निर्मितीत लागतात. DNA आणि RNA आपले गुणधर्म ठरवतात, मुलाकडे पालकांचे गुणधर्म या जीन्सने जातात. कार्बोनिक आम्ल शरीराची पी.एच. संख्या स्थिर ठेवण्यात साहाय्य करतो.
 
आम्ल व आम्लारीनंचे वर्गीकरण
 
तीव्र व सौम्य आम्ल ,आम्लारी आणी अल्क
 
आम्ल व आम्लारींच्या जलीय द्रावनांमधे त्यांचे विचरण कीती प्रमाणात होते त्यावरून त्यांचे वर्गीकरण तीव्र व सौम्य या दोन प्रकारात करतात.
 
१)तीव्र आम्ल(strong acid):तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्यांचे विचरण जवळजवळ पुर्ण होते व त्यांच्या ज्वलिय द्रावनात H+ व संबंधीत आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात.
 
उदाहरणार्थ:  HCl,H2SO4,HNO3.
 
२)सौम्य आम्ल (Waek acids ): सौम्य आम्ल पाण्यात विरघळले असता त्यांचे विचरण पुर्न होत नाही व त्यांच्या ज्वलिय द्रावनात थोड्या प्रमाणात H+ व संबधीत आम्लाचे आम्लधर्मी मूलक या आयनांच्या बरोबर विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात.
 
उदाहरणार्थ: CH3COOH,H2CO3.
 
३)तीव्र आम्लारी(Strong base): तीव्र आम्लारी पाण्यात विरघळले असता त्यांचे विचरण पूर्ण होते व त्यांच्या ज्वलिय द्रावणात OH- व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात.
 
उदाहनार्थ:NaOH,KOH,Na2O.
 
४)सौम्य आम्लारी( waek base): सौम्य आम्लारी पाण्यात विरघळले असता त्यांचे विचरण पूर्ण होत नाही व त्या ज्वलिय द्रावनात कमी प्रमाणातिल  OH- व संबंधीत आम्लरिधर्मी मुलकाबरोबर विचरण न झालेले आम्लारींचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात.
 
उदाहरणार्थ: NH4OH
 
अल्क(alkali): जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्याना अल्क म्हणतात.
 
उदाहरणार्थ: NaOH, KOH  व NH3 यापैकी NaOH व KOH हे तीव्र अल्क आहेत व NH3 हा सौम्य अल्क आहे.
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
२६

संपादने