Jump to content

"रमाबाई रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३९: ओळ ३९:


==सद्य घटना==
==सद्य घटना==
रमाबाई रानडे यांचा जीवनपट चित्रमय रूपात प्रदर्शित करणारी "उंच माझा झोका" ही मालिका २०१२ मध्ये [[झी मराठी]] या दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आली.<ref name=ser>{{cite web|title=समाजसुधारक रमाबाई रानडे यांच्या कर्तृत्वाचा ‘उंच झोका’ झी मराठीवर!|url=http://www.loksatta.com/old/loksattav2/index.php?option=com_content&view=article&id=212701:2012-02-24-16-12-31&catid=166:2009-08-11-13-00-15&Itemid=71|publisher=Lokasatta|accessdate=11 March 2012}}</ref>.
रमाबाई रानडे यांचा जीवनपट चित्रमय रूपात प्रदर्शित करणारी "उंच माझा झोका" ही मालिका २०१२ मध्ये [[झी मराठी]] या दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित करण्यात येत होती. महाराष्ट्र सरकारने सवलतीच्या दरात चित्रीकरणासाठी स्टुडिओ देण्यास नकार दिल्याने मालिकेचे चित्रीकरण आता थांबले आहे. कर्नाटक सरकार जसे कानडी भाषेतील चित्रपटांसाठीट किंवा दूरदर्शन मालिकांसाठी स्वस्त दरात मुक्त परवानगी देते तसे महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्र न्यायप्रिय राज्य असल्याने येथे हिंदी, भोजपुरी, कानडी, इंग्रजी वगैरे भाषांतील चलचित्रणासाठी जो दर आणि ज्या अटी असतात त्याच, सब घोडे बारा टक्के या नियमाने मराठी निर्मात्यांना असतात.<ref name=ser>{{cite web|title=समाजसुधारक रमाबाई रानडे यांच्या कर्तृत्वाचा उंच झोका’ झी मराठीवर!|url=http://www.loksatta.com/old/loksattav2/index.php?option=com_content&view=article&id=212701:2012-02-24-16-12-31&catid=166:2009-08-11-13-00-15&Itemid=71|publisher=Lokasatta|accessdate=11 March 2012}}</ref>.


==संदर्भ==
==संदर्भ==

१२:१४, २८ मे २०१२ ची आवृत्ती

रमाबाई रानडे
जन्म: ५ जानेवारी, इ.स. १८६२
देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: इ.स. १९२४
चळवळ: स्त्री हक्क, स्त्री शिक्षण, सामाजिक चळवळ
पती: महादेव गोविंद रानडे


रमाबाई रानडे (जानेवारी ५, १८६२ – १९२४) या एक स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या.

रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर. त्यांचा वयाच्या ११व्या वर्षी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याबरोबर बालविवाह झाला. लग्नानंतरच रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदी आणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले. न्यायमूर्ती रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतले. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी 'हिंदू लेडीज सोशल क्लब'ची मुंबईमध्ये स्थापना केली. पुण्यातील 'सेवा सदन' या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुण्यात मुलींसाठी 'हुजुरपागा' शाळेची स्थापना केली. त्यांनी आपला जीवनपट 'आमच्या आयुष्यातील आठवणी' या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवला आहे. []

ओळख

रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी १८६२ रोजी सातारा जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नाही. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे बरोबर विवाह झाला. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली.

रमाबाई जरी लहानपणापासून सामाजिक चळवळीचा एक भाग राहिल्या असल्या तरी न्यायमूर्ती रानडेंच्या मृत्यूनंतर (सन १९०१) त्यांनी आपले जीवन पूर्णपणे राष्ट्र्कार्याला अर्पण केले. त्या सतत पुण्याच्या येरवडा येथील मानसिक रुग्णालयाला आणि केंद्रीय तुरुंगाला स्वेच्छेने भेट देऊ लागल्या. स्त्री कैद्यांच्या सामुदायिक प्रार्थना सभांना हजर राहून त्यांचे मनोबळ वाढवून जीवनाचा एक नवीन मार्ग दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मनोरुग्णांच्या इस्पितळाच्या कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहून रुग्णालयाच्या समस्यांकडे त्या लक्ष देत असत. याशिवाय, रमाबाई सामाजिक बांधिलकी म्हणून अन्य रुग्णालयांनाही भेट देत, रुग्णांची आपुलकीने चौकशी करत व त्यांच्यासाठी फळे, फुले आणि पुस्तके घेऊन जात असत. रमाबाई बालसुधारगृहांना भेट देऊन मुलांशी गप्पा मारत आणि सणासुदीच्या दिवशी खाऊ आणि मिठाई वाटत असत.

रमाबाईंची दानशूर वृत्ती भौगोलिक सीमा जुमानणारी नव्हती, त्यांनी १९१३ मध्ये गुजरात आणि काठियावाड येथील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन दुष्काळपीडितांना मदत केली. आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये त्या आपल्या सेवा सदनच्या कार्यकर्त्यांसोबत आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी आळंदीला जात असत. तेथे सेवा सदनच्या कार्यकर्त्या वारीला आलेल्या स्त्री वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करीत असत. त्यांच्या अशा सामाजिक कार्यातून समाजसेवेच्या कार्यात एकूणच स्त्रियांचा सहभाग वाढत गेला. १९०४ मध्ये जेव्हा रामकृष्ण गोपाळ भांडारकर, श्री. भाजेकर आणि सामजिक चळवळीतील नेत्यांनी अखिल भारतीय महिला परिषद आयोजित करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी रमाबाईंकडे या कार्याची सूत्रे सपूर्द केली. रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे पहिले अधिवेशन डिसेंबर १९०४ रोजी मुंबई येथे भरले होते.

१९०८ मध्ये श्री. बी.एम. मलबारी आणि श्री. दयाराम गिडुमल हे, रमाबाईंकडे स्त्रियांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण देऊन समाजात रुग्णसेविका निर्माण करण्याची कल्पना घेऊन आले. त्यातूनच मग रमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली सेवा सदन, मुंबईची स्थापना झाली. १९१५ साली, सेवा सदन, पुणे उदयास आली आणि मग अनेक शाखांमार्फत संस्था विस्तारत गेली. मुलींचे प्रशिक्षण केंद्र, तीन वसतीगृहे असे अनेक उपक्रम सेवा सदनमार्फत राबवले गेले.

१९२४ मध्ये, रमाबाईंच्या मृत्यूसमयी पुण्याच्या सेवा सदनमधील विविध उपक्रमांमध्ये १००० हून अधिक महिला प्रशिक्षण घेत होत्या. सेवा सदनचा इतका झपाट्याने झालेला विस्तार आणि प्रसार हा रमाबाईंच्या कार्यामागील ध्यासाचेच द्योतक होते. समाजातील रूढ समजुतींच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन समाजाचे मतपरिवर्तन करून सेवेचे अखंडित व्रत सुरू ठेवण्यातच रमाबाईंच्या जीवनाची इतिकर्तव्यता होती. रमाबाईंच्या आयुष्यातील अजून दोन अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे, स्त्रियांसाठी अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची मागणी करण्यासाठी केलेले आंदोलन आणि १९२१-२२ मध्ये मुंबई प्रांतात स्थापन केलेली पीडित महिलांची संघटना. रमाबाईंच्या समाजातील अतुलनीय कामगिरीची दखल खुद्द महात्मा गांधीनी घेतली. गांधीनी लिहिलेल्या शोकसंदेशाचा मजकूर : " रमाबाई रानडे यांचा मृत्यू ही राष्ट्राची मोठी हानी आहे. हिंदू विधवांसाठी रमाबाई या मोठा आधारस्तंभ होत्या. त्यांच्या नामांकित पतीच्या सामाजिक चळवळीत एका सच्च्या सहधर्मचारिणीप्रमाणेच त्या नेहमी वागल्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी सामाजिक चळवळीलाच आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले. न्यायमूर्ती रानडे हे एक क्रांतिकारी विचारवंत आणि भारतीय स्त्रिंयांच्या सामाजिक सुधारणेची कळकळ असणारे असे होते.ते त्यासाठी सतत झटत राहिले. रमाबाईंनी सेवा सदनमध्ये आपले आयुष्य ओतले. मनापासून आपल्या सर्व शक्तीनिशी त्यांनी सेवा सदन उभे केले. सेवा सदन ही संपूर्ण भारतातील या धर्तीची एकमेव संघटना आहे." भारतीय डाक आणि तार विभागाने रमाबाईंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याच्या गौरवाप्रीत्ययर्थ खास पोस्टाचे तिकिट काढले होते.

ठळक घटना

रमाबाई या आधुनिक स्त्री चळवळीच्या अग्रणी नेत्या होत्या. स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या खंबीर आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

महादेव रानडे हे पुण्यात उपन्यायाधीश होते. अतिशय पारदर्शी न्यायनिवाडा करणारे आणि मानवतावादी दृष्टिकोन असणारे न्यायाधीश असा त्यांचा लौकिक होता. समाजातील वाईट रूढी, परंपरा यांना विरोध करत त्यांनी अस्पृश्यता, बालविवाह आणि सती या प्रथांविरोधात आवाज उठवला. मुंबई प्रांतात पहिला पुनर्विवाह संमत करून तो पार पाडणारे ते प्रथमच. त्यांनी स्त्री शिक्षण आणि समान अधिकाराची मागणी पुढे करण्यासाठी अनेक सार्वजनिक सभा आणि चळवळी उभारल्या. महाराष्ट्रातील विचारवंत मंडळींमध्ये महादेव रानडे हे नाव, त्यांच्या ऐन तिशीमध्येच दाखल झाले.

आपल्या पतीच्या सामजिक आयुष्याचा भाग बनून त्यांची मदत करण्याच्या ध्यासाने रमाबाईंनी शिक्षणाची कास धरली. त्या सर्वप्रथम एक उत्तम विद्यार्थी बनल्या, मग हळूहळू त्या महादेव रानड्यांच्या सचिव झाल्या, आणि शेवटी त्या एक उत्तम सहकारी व मित्र झाल्या. महादेवराव सुरुवातीला रमाबाईंना साधी अक्षरओळख, मराठी वाचन करवून घेत. मग इतिहास, भूगोल, गणित आणि इंग्रजीचेही धडे त्यांनी रमाबाईंना दिले. पुढे रोजचे वर्तमानपत्र ते रमाबाईंना वाचावयास लावून घडलेल्या घटनांवर त्यांच्याशी चर्चा करत. रमाबाईंना इंग्रजी वाङ्मयाची विशेष गोडी निर्माण झाली होती.

रमाबाईंनी स्वत:च्या आयुष्यातील घटना शब्दरूप करून मराठी वाङ्‌मयाला एक मोठी देणगी दिली आहे. तसेच त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांची धर्मशास्त्रावरील अनेक भाषणे प्रकाशित केली.

रमाबाईंनी सर्वप्रथम जाहिर भाषण नाशिक हायस्कूलमध्ये एका कार्यक्रमात केले. रमाबाईंनी मराठी आणि इंग्रजी भाषेवर वाक् नैपुण्य आत्मसात केले होते. त्यांची भाषणे ही अत्यंत साध्या भाषेत असली तरीही श्रोत्यांच्या मनाला भिडणारी असत. त्यांनी मुंबई मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली. १८९३ ते १९०१ या काळात त्यांच्या सामाजिक कर्तृत्वाचा आलेख हा सतत उंचवणारा होता. त्यांनी हिंदू लेडिज सोशल आणि लिटररी क्लबची मुंबईत स्थापना केली, तसेच महिलांना भाषा, सामान्य ज्ञान, शिवणकाम आणि हस्तकला यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले.

पतीच्या निधनानंतरचा काही काळ हा दु:खात आणि निराशाजनक होता. त्या मुंबई सोडून पुण्याला परत गेल्या आणि फुले मंडई जवळच्या आपल्या जुन्या वाड्यात राहू लागल्या. सुमारे एक वर्ष त्यांनी एकाकी आयुष्य व्यतीत केले. स्वत:वर लादलेला हा एकांतवास साधारण एक वर्षाने त्या सामाजिक आयुष्यात सक्रिय झाल्या आणि त्यांनी भारत महिला परिषदेचे मुंबई मध्ये आयोजन केले. पतीच्या मृत्यूनंतर आयुष्याची २४ वर्षे रमाबाईंनी समाज जागृती आणि सेवा सदन सारख्या पीडीत महिलांना सशक्त बनवणार्‍या सामाजिक चळवळी उभारण्यात वाहून घेतली.

Ramabai vigorously worked for the next 25 years for womens education, legal rights, equal status, and general awakening. She encouraged them to enter the nursing profession. At that time, this profession was not looked up on as service-oriented and was considered as a taboo for wom-en. To encourage women to come forward she asked: dont we nurse our father or brother when he falls ill? All male patients are our brothers and nursing them is our sacred duty. Thus more and more women came forward to learn nursing. Ramabais pioneering work in the field of nursing through Seva Sadan deserves special praise. The first Indian nurse was the product of Seva Sadan and Ramabai took great pain to win orthodox opinion in fervor of nursing as a career for women and to encourage young girls and widows to join the nursing course in Seva Sadan.

In those days mostly widows took the nursing course sponsored by Seva Sadan. Once there was an occasion of the annual social gathering of Seva Sadan. One of the highlights of the function was the prize distribution ceremony. Among the prize winners was a widow. She was dressed in the traditional dress of the widows of those days, a simple dark red sari with the Pallu tightly drawn over her clean-shaven head. As the widow stepped on the stage, the student crowding the galleries started hooting and shout-ing. This outburst of misbehavior hurt Ramabais feelings deeply. As she stood upon the stage towards the end of the function to give a brief thanksgiving speech, she was so provoked that she could not help chastising the student crowd with all the severity at her command: "You are college students and yet how can you be regarded as educated? How can those be considered as educated who not only do not extend sympathy to their unfortunate sisters who have fallen victims to cruel fate and merciless social customs, but find it fit to heap ridicule on them? Every one of you probably has some unfortunate widow sheltered under your roof, may be your sister, cousin or aunt or even your own mother. If you had kept this in mind you would not have misbehaved the way you did". These were sharp, stinging words striking the students like a whiplash. There was pin drop silence. It was a triumph of Ramabais powerful and spellbinding personality.

She worked relentlessly against the system of child marriage. All these efforts took shape in establishing the Seva Sadan Society in Bombay, which substituted as a home for a number of distressed women. She started Pune Seva Sadan Society in her own ancestral house. This later developed into an institution offering a number of facilities like hostels, training colleges, vocational centers, selling centers etc. Ramabais fame became synonymous with Seva Sadan. This was her great-est contribution to the welfare of middle class women. Ramabai participated in the War Conference and spoke to the Governor on behalf of Indian women. She also fought for the cause of Indian labour in Fiji and Kenya. She even worked for womens right to franchise. Everyone adored her, but she was modest to call herself a shadow of her husband. Indian Post issued a Postage stamp in her memory on 15th August 1962 picturing her for her great contribution towards the society.

सद्य घटना

रमाबाई रानडे यांचा जीवनपट चित्रमय रूपात प्रदर्शित करणारी "उंच माझा झोका" ही मालिका २०१२ मध्ये झी मराठी या दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित करण्यात येत होती. महाराष्ट्र सरकारने सवलतीच्या दरात चित्रीकरणासाठी स्टुडिओ देण्यास नकार दिल्याने मालिकेचे चित्रीकरण आता थांबले आहे. कर्नाटक सरकार जसे कानडी भाषेतील चित्रपटांसाठीट किंवा दूरदर्शन मालिकांसाठी स्वस्त दरात मुक्त परवानगी देते तसे महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्र न्यायप्रिय राज्य असल्याने येथे हिंदी, भोजपुरी, कानडी, इंग्रजी वगैरे भाषांतील चलचित्रणासाठी जो दर आणि ज्या अटी असतात त्याच, सब घोडे बारा टक्के या नियमाने मराठी निर्मात्यांना असतात.[].

संदर्भ

  1. ^ "Diamond Maharashtra Sankritikosh (मराठी: डायमंड महाराष्ट्र संस्कृतीकोश)," Durga Dixit, Pune, India, Diamond Publications, 2009, p. 40. ISBN 978-81-8483-080-4.
  2. ^ "समाजसुधारक रमाबाई रानडे यांच्या कर्तृत्वाचा उंच झोका' झी मराठीवर!". Lokasatta. 11 March 2012 रोजी पाहिले.

साचा:Persondata