"स्फिंक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: '''स्फिंक्स''' ही ग्रीक पुराणांत वर्णिलेली एक राक्षसी. ही कायमियरा ... |
(काही फरक नाही)
|
१४:११, ११ मे २०१२ ची आवृत्ती
स्फिंक्स ही ग्रीक पुराणांत वर्णिलेली एक राक्षसी. ही कायमियरा व ऑर्थस यांची कन्या. (दुसऱ्या वृत्ताप्रमाणे एकिडन व टायफॉन यांची मुलगी.) हिला स्त्रीसारखे डोके व छाती, कुत्र्यासारखे शरीर, सापाप्रमाणे शेपटी, पक्ष्याप्रमाणे पंख आणि सिंहाप्रमाणे पंजे होते. हिचा आवाज मात्र मानवी होता. थीब्जशहराच्या परिसरात ती हिंडत असे, व लोकांना कोडी घालत असे. ज्यांना उत्तर देता येत नसे त्यांनी ती खाऊन टाकत असे. थीब्जच्या लोकांना समजले की स्फिंक्सच्या एखाद्या कोड्याचे कुणी बरोबर उत्तर दिले तर ती स्वत:चा नाश करून घेईल. थीब्जचाराजा क्रेऑननए जाहीर केले होते कीजो कोणी तिचे कोडे सोडवील त्याला थीब्जचा राजमुकुट व क्रेऑनची भगिनी जोकॅस्टा मिळेल.
इडिपसने स्फिंक्सचे कोडे सोडवल्याबरोबर तिने खडकावर डोके आपटून जीव दिला.
इजिप्शियन स्फिंक्सला सिंहाचे शरीर व पुरुषाचे डोके आहे, पंख नाहीत. इजिप्तमध्ये स्फिंक्स ही होरस देवाची प्रतिमा मानली जाते. त्या देशातील गिझाच्या पिरॅमिडजवळ स्फिंक्सची मोठ्यात मोठी प्रतिमा आहे.