स्फिंक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


स्फिंक्स ही ग्रीक पुराणांत वर्णिलेली एक राक्षसी. ही कायमियरा व ऑर्थस यांची कन्या. (दुसऱ्या वृत्ताप्रमाणे एकिडन व टायफॉन यांची मुलगी.) हिला स्त्रीसारखे डोके व छाती, कुत्र्यासारखे शरीर, सापाप्रमाणे शेपटी, पक्ष्याप्रमाणे पंख आणि सिंहाप्रमाणे पंजे होते. हिचा आवाज मात्र मानवी होता. थीब्ज शहराच्या परिसरात ती हिंडत असे व लोकांना कोडी घाली. ज्यांना उत्तर देता येत नसे त्यांना ती खाऊन टाकी. थीब्जच्या लोकांना एकदा समजले की, स्फिंक्सच्या एखाद्या कोड्याचे कुणी बरोबर उत्तर दिलेच, तर ती स्वत:चा नाश करून घेईल. थीब्जचा पालकराजा क्रेओनने जाहीर केले होते की, जो कोणी तिचे कोडे सोडवील त्याला थीब्जचा राजमुकुट व क्रेऑनची भगिनी जोकॅस्टा मिळेल.

इडिपसने स्फिंक्सचे कोडे सोडवल्याबरोबर तिने खडकावर डोके आपटून जीव दिला.

इजिप्शियन स्फिंक्सला सिंहाचे शरीर व पुरुषाचे डोके आहे, पंख नाहीत. इजिप्तमध्ये स्फिंक्स ही होरस देवाची प्रतिमा मानली जाते. त्या देशातील गिझाच्या पिरॅमिडजवळ स्फिंक्सची मोठ्यात मोठी मूर्ती आहे.