"हिराबाई पेडणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: '''हिराबाई पॆडणेकर''' (जन्म :सावंतवाडी २२ नोव्हेंबर १८८६; मृत्यू : पा... |
(काही फरक नाही)
|
२०:१९, ११ मार्च २०१२ ची आवृत्ती
हिराबाई पॆडणेकर (जन्म :सावंतवाडी २२ नोव्हेंबर १८८६; मृत्यू : पालशेत-रत्नागिरी १८ ऑक्टोबर १९५१) यांच्या घराण्यातच नृत्य, संगीत या कला होत्या. त्यांना चागले संस्कृत येत होते. त्या मराठीत उत्तम कविताही करीत. त्यांच्या कविता मनोरंजन या मासिकात प्रसिद्ध होत. त्यांचे संगीतातले अधिक शिक्षण भास्करबुवा बखले यांच्याकडे झाले. गुर्जरशास्त्री यांच्याकडून हिराबाईंनी, संस्कृत नाट्यशास्त्र, आणि नाट्यवाङ्मय यांच्या सूक्ष्म अभ्यासासाठी मार्गदर्शन घेतले. गोविंद बल्लाळ देवल यांच्या प्रेरणेने त्यांना मराठी नाटकाची गोडी लागली. पुढे मराठी साहित्यिक राम गणेश गडकरी, बालकवी ठोंबरे यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यानंतर हिराबाई पेडणेकरांचा अण्णासाहेब किर्लोस्कर आणि बालगंधर्व यांच्यासारख्या नाट्यक्षेत्रातील मंडळींशी, आणि पुढे नानासाहेब फाटक, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याशी घनिष्ट संबंध आला. या मंडळींकडून स्फूर्ती घेऊन हिराबाई पेडणेकर स्वत:च नाटककार झाल्या.
त्यांची संगीत जयद्रथ-विडंबन(इ.स.१९०४) आणि संगीत दामिनी(इ.स. १९१२) ही नाटके रंगभूमीवर गाजली. त्यांनी लिहिलेली मीराबाई आणि कवी जयदेवाची पत्नी यांच्यावरच्या दोनही नाटकांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.