Jump to content

"अरुण दाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो clean up using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२: ओळ ४२:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


'''{{लेखनाव}}'''(जन्म:१९३५) हे मराठी भावगीत गायक आहेत. भारतीय संगीताच्या क्षेत्रात राजवाड्याबाहेर जे संगीताचे दरबार भरत, त्यांत इंदूरच्या रामूभैय्या दाते यांचा दरबार अत्यंत प्रतिष्ठेचा आणि तालेवार रसिकांचा मानला जाई. हे रामूभैय्या म्हणजे अरुण दातेंचे वडील. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे अगदी सुरुवातीला गाणे शिकले. पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला, पण त्यात अस्सल घरंदाज गायकीचे रंग मिसळलेले. घरात असताना दिवसभर गाणे कानावर पडत असल्याने कान तयार आणि संगीताची उत्तम जाण. असा असलेला आपला मुलगा गायक व्हावा हे रामूभैय्यांचे स्वप्न अरुणने प्रत्यक्षात आणले.
'''{{लेखनाव}}''' हे मराठी भावगीत गायक आहेत.


अरुण दाते टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत रहात असताना ते [[पु.ल.देशपांडे]] यांना भेटतअसत. पुलंनीच अरुण दाते हे उत्तम गात असल्याचे पाहून रामूभैय्या दातेंना तसे सांगितले. संगीतातले दर्दी, कलावंतांबद्दल असीम जिव्हाळा, आणि त्यांचे कलेबद्दल अतीव आदर असलेले रामूभैय्या दाते हे ऐकून प्रसन्न झाले. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीच्या पराक्षेत अरुण दाते नापास झाल्याचे समजल्यावर ते म्हणाले "टेक्स्टाइल इंजिनिअर होणारे अनेक जण आहेत, पण तुझ्यासारखे गाणे किती जणांना येते ते सांग". घरूनच असे प्रोत्साहन असल्याने, अरुण दाते यशस्वी टेक्स्टाइल इंजिनिअरबरोबरच यशस्वी गायक झाले यात आश्चर्य नाही.



इ.स. १९५५पासून अरुण दाते आकाशवाणीवर गाऊ लागले.
==पुरस्कार==
==पुरस्कार==

* पहिला गजाननराव वाटवे पुरस्कार (इ.स.२०१०)
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर अरुण दाते यांनी गायलेली गाणी]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर अरुण दाते यांनी गायलेली गाणी]

१३:४४, २८ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

अरुण दाते
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील रामूभय्या दाते
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य पार्श्वगायन, सुगम संगीत, भावगीत
पेशा गायकी

अरुण दाते(जन्म:१९३५) हे मराठी भावगीत गायक आहेत. भारतीय संगीताच्या क्षेत्रात राजवाड्याबाहेर जे संगीताचे दरबार भरत, त्यांत इंदूरच्या रामूभैय्या दाते यांचा दरबार अत्यंत प्रतिष्ठेचा आणि तालेवार रसिकांचा मानला जाई. हे रामूभैय्या म्हणजे अरुण दातेंचे वडील. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे अगदी सुरुवातीला गाणे शिकले. पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला, पण त्यात अस्सल घरंदाज गायकीचे रंग मिसळलेले. घरात असताना दिवसभर गाणे कानावर पडत असल्याने कान तयार आणि संगीताची उत्तम जाण. असा असलेला आपला मुलगा गायक व्हावा हे रामूभैय्यांचे स्वप्न अरुणने प्रत्यक्षात आणले.

अरुण दाते टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत रहात असताना ते पु.ल.देशपांडे यांना भेटतअसत. पुलंनीच अरुण दाते हे उत्तम गात असल्याचे पाहून रामूभैय्या दातेंना तसे सांगितले. संगीतातले दर्दी, कलावंतांबद्दल असीम जिव्हाळा, आणि त्यांचे कलेबद्दल अतीव आदर असलेले रामूभैय्या दाते हे ऐकून प्रसन्न झाले. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीच्या पराक्षेत अरुण दाते नापास झाल्याचे समजल्यावर ते म्हणाले "टेक्स्टाइल इंजिनिअर होणारे अनेक जण आहेत, पण तुझ्यासारखे गाणे किती जणांना येते ते सांग". घरूनच असे प्रोत्साहन असल्याने, अरुण दाते यशस्वी टेक्स्टाइल इंजिनिअरबरोबरच यशस्वी गायक झाले यात आश्चर्य नाही.


इ.स. १९५५पासून अरुण दाते आकाशवाणीवर गाऊ लागले.

पुरस्कार

  • पहिला गजाननराव वाटवे पुरस्कार (इ.स.२०१०)

बाह्य दुवे