"बाळशास्त्री जांभेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २१: ओळ २१:
'दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. [[भाऊ दाजी लाड]], [[दादाभाई नौरोजी]] हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत.<ref>लोकसत्ता रविवार, २३ जून २००२</ref> <br />
'दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. [[भाऊ दाजी लाड]], [[दादाभाई नौरोजी]] हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत.<ref>लोकसत्ता रविवार, २३ जून २००२</ref> <br />
'एशियाटिक सोसायटी' या त्रैमासिकांत शोध निबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी १८४५ मध्ये काढली होती.
'एशियाटिक सोसायटी' या त्रैमासिकांत शोध निबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी १८४५ मध्ये काढली होती.
मराठी, संस्कृत, इंग्लिश, हिंदी बरोबरच ग्रीक व लॅटिन भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
मराठी, संस्कृत, इंग्लिश, हिंदी, गुजराथी, कानडी, फारसी बरोबरच ग्रीक व लॅटिन भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात हिंदीचे अध्यापन करीत. त्या काळात त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे आपला समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवले की, नुसते महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही. संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. श्रीपती शेषाद्री नावाच्या एका मुलाला त्यांनी योग्य रस्ता दाखवला, आणि मग त्यांना असे वाटले की, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र सुरू केले पाहिजे. आणि त्यांनी ’दर्पण’ सुरू केले. मराठीतले ते आद्य पत्रकार.
ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात हिंदीचे अध्यापन करीत. त्यांनी प्रकाशित केलेल्या साहित्यांत 'नीतिकथा', 'इंग्लंड देशाची बखर', 'इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप', 'हिंदुस्थानचा इतिहास', 'शून्यलब्धिगणित' या ग्रंथांचा समावेश आहे.
त्यांनी प्रकाशित केलेल्या साहित्यांत 'नीतिकथा', 'इंग्लंड देशाची बखर', 'इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप', 'हिंदुस्थानचा इतिहास', 'शून्यलब्धिगणित' या ग्रंथांचा समावेश आहे.


==मान्यता==
==मान्यता==

१३:२०, १७ मे २०१० ची आवृत्ती

बाळशास्त्री जांभेकर (६ जानेवारी, १८१२ - १८ मे, १८४६) हे मराठी भाषेतले आद्य पत्रकार होते. त्यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र जानेवारी ६, १८३२ रोजी सुरू केले.

जीवन

त्यांचा जन्म राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गांवी झाला होता.

दर्पण वृत्तपत्र

इंग्रजी राजवटीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. त्याच जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय अवघे २० वर्षे होते.
जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश सरकारपर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्रजी भाषेत असायचा.[१]
वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. दर्पण सुमारे साडेआठ वर्षं नियमितपणे प्रकाशित होत होते. त्याच्या शेवटच्या अंकाचे प्रकाशन जुलै १८४० मध्ये झाले.
तत्कालीन सामाजिक समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले जावे, तसेच समाजात जागृती होऊन बालविधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळावी इ. विषयांवर वृत्तपत्रांतील संपादकीय लेखांचा भर असे.

समाज कार्य

जांभेकरांनी वाचनालयांचे महत्त्व ओळखून 'बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' ची स्थापना केली. मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी १८४० साली सुरू केले होते. 'दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत.[२]
'एशियाटिक सोसायटी' या त्रैमासिकांत शोध निबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी १८४५ मध्ये काढली होती. मराठी, संस्कृत, इंग्लिश, हिंदी, गुजराथी, कानडी, फारसी बरोबरच ग्रीक व लॅटिन भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात हिंदीचे अध्यापन करीत. त्या काळात त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे आपला समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवले की, नुसते महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही. संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. श्रीपती शेषाद्री नावाच्या एका मुलाला त्यांनी योग्य रस्ता दाखवला, आणि मग त्यांना असे वाटले की, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र सुरू केले पाहिजे. आणि त्यांनी ’दर्पण’ सुरू केले. मराठीतले ते आद्य पत्रकार. त्यांनी प्रकाशित केलेल्या साहित्यांत 'नीतिकथा', 'इंग्लंड देशाची बखर', 'इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप', 'हिंदुस्थानचा इतिहास', 'शून्यलब्धिगणित' या ग्रंथांचा समावेश आहे.

मान्यता

जानेवारी ६ हा 'दर्पण' वृत्तपत्राच्या प्रथम प्रकाशनाचा दिवस (आणि योगायोगाने जांभेकरांचा जन्मदिन) महाराष्ट्रांत 'पत्रकारिता दिवस' म्हणून साजरा होतो.

इतर

  • 'युगप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर- काळ आणि कर्तृत्व' लेखिका: नीला उपाध्ये

संदर्भ

  1. ^ http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=9&id=741
  2. ^ लोकसत्ता रविवार, २३ जून २००२

बाह्य दुवे