Jump to content

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Rescuing 0 sources and tagging 1 as dead.) #IABot (v2.0.9.5
ओळ २८: ओळ २८:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [https://ladakibahin.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळ]
* [https://ladakibahin.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळ]{{मृत दुवा|date=September 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
* [https://www.tv9marathi.com/maharashtra/how-many-women-in-a-household-can-avail-the-benefit-of-chief-minister-ladki-bahin-yojana-1231381.html मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एका घरातील किती महिला घेऊ शकतात लाभ]
* [https://www.tv9marathi.com/maharashtra/how-many-women-in-a-household-can-avail-the-benefit-of-chief-minister-ladki-bahin-yojana-1231381.html मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एका घरातील किती महिला घेऊ शकतात लाभ]



१४:१२, २३ सप्टेंबर २०२४ ची आवृत्ती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना ₹ १,५००/- असा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

पात्रता

  1. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  2. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  3. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  4. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. अर्जदाराचे हमीपत्र
  4. अधिवास / जन्म प्रमाणपत्र / मतदार ओळखपत्र
  5. उत्पन्नाचा दाखला

अर्ज कोणाकडे जमा करावा?

या योजनेच्या सुरुवातीला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेधिका, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी तसेच अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरण्याची सुविधा दिल्या गेली होती. मात्र, यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सप्टेंबर २०२४ पासून राज्य सरकारने या योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार केवळ अंगणवाडी सेविकांना दिले आहेत.[]

अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र सरकारने या योजेचा अर्ज भरण्याची प्रथम ३१ ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतची दिली आहे.[]

पहिला हप्ता

या योजनेत जुलै'२४ आणि ऑगस्ट'२४ अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८८ कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली.[]

संदर्भ

  1. ^ a b c "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिलांना मिळाले? राज्य सरकारनं जारी केली आकडेवारी". एबीपी माझा. २१ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे