मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै २०२४ मध्ये महिलांसाठी सुरू केलेली एक योजना आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली होती.[१]
या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना ₹ १,५००/- असा आर्थिक लाभ देण्यात येतो.[१]
पात्रता
[संपादन]- महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
- किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
- लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे
[संपादन]लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी खालील पाच कागदपत्रे आवश्यक आहेत.
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळेचा दाखला / १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र (यांपैकी एक)
- रेशन कार्ड / उत्पन्नाचा दाखला (यांपैकी एक)
- हमीपत्र
- बँक पासबुक
अर्ज कोणाकडे जमा करावा?
[संपादन]या योजनेच्या सुरुवातीला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेधिका, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, सेतू केंद्र, सामान्य महिला इत्यादींना नारीशक्ती दूत ॲपवर आणि नंतर ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरण्याची सुविधा दिल्या गेली होती. मात्र, यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सप्टेंबर २०२४ पासून राज्य सरकारने या योजनेचे अर्ज भरण्याचे करण्याचे अधिकार केवळ अंगणवाडी सेविकांना दिले आहेत.[२]
अर्ज सादर करण्याची मुदत
[संपादन]महाराष्ट्र सरकारने या योजेचा अर्ज भरण्याची प्रथम ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतची दिली होती.[२] त्यानंतर ही १० ऑक्टोबर रोजी ही मुदत परत वाढवून १५ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आली.[३]
लाभ
[संपादन]या योजनेत जुलै'२४ आणि ऑगस्ट'२४ अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख महिलांना ४,७८८ कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली.[२]
या योजनेमध्ये २४ सप्टेंबरपर्यंतची २.५० कोटी अर्ज दाखल झाले होते तरह त्यांपैकी २ कोटी ४० लाख अर्ज मंजूर करण्यात आले होते.[४]
१५ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या १,१२,७०,२६१ आहे, तर त्यांपैकी मंजूर अर्जांची एकूण संख्या १,०६,६९,१३९ आहे. १६ ऑक्टोंबर पासून आचारसंहिता लागल्यामुळे अनेक अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण होऊ शकले नाही.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c https://ladakibahin.maharashtra.gov.in
- ^ a b c "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिलांना मिळाले? राज्य सरकारनं जारी केली आकडेवारी". एबीपी माझा. २१ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ Hande, Siddhi (12 ऑक्टो, 2024). "Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ; अर्ज कुठे आणि कसा करायचा? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या". Marathi News Saam TV.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ जाधव, युवराज (2024-09-27). "लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑक्टोबरमध्येही करता येणार? राज्य सरकार मुदतवाढ देण्याची शक्यता". marathi.abplive.com. 2024-10-02 रोजी पाहिले.