"ज्ञानराज काशीनाथ गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''ज्ञानराज काशिनाथ गायकवाड''' 'राजवंश' हे एक मराठी व हिंदी भाषेतील लेखक व माजी प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म सरकोली (तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर) येथे माता लक्ष्मीबाई आणि पिता काशिनाथ यांच्या [[महार]] जातीच्या ग्रामीण कुटुंबात २५ सप्टेंबर १९३८ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव ढवळस (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) होते. |
'''ज्ञानराज काशिनाथ गायकवाड''' 'राजवंश' हे एक मराठी व हिंदी भाषेतील लेखक व माजी प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म सरकोली (तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर) येथे माता लक्ष्मीबाई आणि पिता काशिनाथ यांच्या [[महार]] जातीच्या ग्रामीण कुटुंबात २५ सप्टेंबर १९३८ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव ढवळस (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४४१|language=मराठी}}</ref> |
||
== शिक्षण == |
== शिक्षण == |
१७:०९, ३० जानेवारी २०२१ ची आवृत्ती
ज्ञानराज काशिनाथ गायकवाड 'राजवंश' हे एक मराठी व हिंदी भाषेतील लेखक व माजी प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म सरकोली (तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर) येथे माता लक्ष्मीबाई आणि पिता काशिनाथ यांच्या महार जातीच्या ग्रामीण कुटुंबात २५ सप्टेंबर १९३८ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव ढवळस (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) होते.[१]
शिक्षण
त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकोली, मंगळवेढा व पंढरपूर येथे झाले. मराठी सातवीच्या परीक्षेत पंढरपूर केंद्रात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि हायस्कूल कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण होऊन हायस्कूल कॉलरशिप मिळवली. पंढरपूर येथे जून १९५९ मध्ये ते मॅट्रीकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे चार वर्षात महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून त्यांनी जून १९६३ मध्ये पुणे विद्यापीठाची बीए ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून जुन १९६५ मध्ये एमए ची पदवी मिळवली आणि वरिष्ठ महाविद्यालयात हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून काम करण्यास पात्र झाले.
प्राध्यापकाची नोकरी करत असताना त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये जून १९७३ मध्ये पीएचडी साठी शोध निबंध सादर केला आणि जानेवारी १९७४ मध्ये त्यांना हिंदी विषयातील पीएचडी मिळाली.
प्राध्यापक
सप्टेंबर १९६५ ते १७ जून १९७३ पर्यंत उमरगा (जिल्हा उस्मानाबाद) येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये त्यांनी हिंदी विषयाचा प्राध्यापक व हिंदी विषयाचे विभाग प्रमुख म्हणून काम केले.
१८ जून १९७३ ते ३० सप्टेंबर १९९८ पर्यंत ते बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे प्राध्यापक, प्रपाठक (रीडर) आणि पदवी व पदव्युत्तर हिंदी विभाग प्रमुख होते. येथूनच १ ऑक्टोंबर १९९८ रोजी प्राध्यापकाच्या ते नोकरीतून निवृत्त झाले.
कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मान्यतेनुसार हिंदी विषयातील पीएचडी पदवीचा यशस्वी मार्गदर्शक झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा प्राध्यापक विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळवली.
लेखन कार्य
हिंदी लेखन
त्यांनी प्रामुख्याने हिंदी भाषेमधून ग्रंथ लेखन व ललित लेखनही केले. कानपूर, आग्रा व नवी दिल्ली येथील हिंदी प्रकाशकांनी त्यांचे हिंदी भाषेमधील ग्रंथलेखन व ललित लेखन प्रकाशित केले आहे.
- आधुनिक हिन्दी नाटकों में संघर्ष तत्व
- साहित्यरूप: शास्त्रीय विश्लेषण
- उपयोगी हिंदी व्याकरण
- पाश्चात्य साहित्य सिद्धान्त और विविध वाद
- हिंदी भाषाविज्ञान परिचय
- भारतीय काव्य-सिद्धांत
- साहित्य का कलार्थ-सौंदर्य सिद्धांत
- भगवद्गीता का संवाद-सौंदर्य सार्थ भगवद्गीता
- महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
- भारतीय और पाश्चात्य काव्य सिद्धांत
- स्वत्व (काव्यसंग्रह)
- गीत-गजल (काव्यसंग्रह)
- जेता मैं भाग्यवान कर्तुत्वान (आत्मकथा)
इंग्रजी लेखन
- द मिरॅक्युलस ग्रेट मॅन: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
मराठी लेखन
- भगवद्गीतेचे संवादसौंदर्य आणि सार्थ भगवद्गीता
- महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
- गीत गुंजन (काव्यसंग्रह)
- जीता मी भाग्यवान कर्तुत्वान (आत्मचरित्र)
संपादन
- रंगधारा
- नवरंग (मराठी कथासंग्रह)
इतर
- त्यांनी हिंदी नियतकालिकांमधून आणि मराठी वृत्तपत्रांमधून विविध लेख प्रकाशित केले. आकाशवाणी पुणे, मुंबई व सोलापूर केंद्रावरून साहित्यविषयक कार्यक्रमांचे व रेडिओ नाटकांचे प्रसारित झाले.
- लेखकाचे विशेष कर्तृत्व दर्शवणारा "साहित्य रूपों की महत्ता" नावाचा गौरव ग्रंथ लेखकाच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त हिंदी भाषेत प्रकाशित केला गेला.
- "उपयोगी हिंदी व्याकरण" या ग्रंथास महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने "पं. महावीरप्रसाद दि्ववेदी" नावाचा पुरस्कार दिला.
- प्रसिद्ध लेखक म्हणून ई.टीव्ही.मराठीने त्यांची एक तासाची मुलाखत प्रसारित केली.
संदर्भ
[ संदर्भ हवा ]