"विमलसूर्य चिमणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: मार्शल '''विमलसूर्य चिमणकर''' हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
१९:४०, ११ जानेवारी २०२१ ची आवृत्ती
मार्शल विमलसूर्य चिमणकर हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते आंबेडकरवादाचे भाष्यकार होते, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.[१]
चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.[२]
निधन
वयाच्या ६५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[३]
लेखन
चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
- द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर
- रिडल्स नंतरचा जातीय वणवा
- दोन सूर्य दोन घुबडे
- सूर्यांकुर
- मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद
- नामांतर वा सत्तांतर
- खैरलांजी एक सवाल
- वेटिंग फार व्हिसा
- साकेत कि अयोध्या?
- ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms