Jump to content

"कास्ट मॅटर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३३: ओळ ३३:
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:इ.स. २०१९ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इंग्लिश पुस्तके]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

१८:२५, २१ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती

कास्ट मॅटर्स
लेखक सूरज येंगडे
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) Caste Matters
भाषा इंग्लिश
देश भारत
प्रकाशन संस्था पेंग्विन रँडम हाऊस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
प्रथमावृत्ती २०१९
पृष्ठसंख्या ३०४

कास्ट मॅटर्स हे अभ्यासक सूरज येंगडे लिखित एक इंग्लिश पुस्तक आहे.[] भारतातील जातवास्तव, स्वत:ला मिळालेले जातीचे चटके, दलितांची सध्यस्थिती, जातीअंताच्या चळवळीसमोरची आव्हाने याचा उहापोह सूरज यांनी त्यांच्या या पुस्तकातून केला आहे. या पुस्तकामागची भूमिका सांगतान सूरज म्हणतात, "जगभरातील राजकीय-सामाजिक चळवळींचे मी जेव्हा विश्लेषण करत होतो, तिथून जेव्हा मी भारताकडे पाहायचो, तेव्हा मी एक तुलनात्मक अभ्यास मांडण्याचा प्रयत्न करायचो. भारतातील दलित चळवळ असेल, भारतातील आदिवासी चळवळ असेल किंवा ओबीसी चळवळ असेल, जो प्रभुत्वशाली वर्ग आहे, त्याची परिस्थिती काय आहे? माध्यमातील अभिजन, साहित्यातील अभिजन, उद्योगातील अभिजन यांची काय परिस्थिती आहे, याच्याकडे जेव्हा मी तुलनात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा वेळोवेळी हीच गोष्ट पुढे यायची की भारताच्या परिस्थितीमध्ये जात हीच केंद्रस्थानी असलेली बाब आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, कोणत्याही प्रदेशातील असा, कोणत्याही विचारधारेचे असा जात हा सार्वत्रिक बाईंडिंग फॅक्टर आहे, कारण तुम्ही एका जातीत जन्माला येता आणि त्या जातीसोबतच जगता. तुम्हाला जातीपासून दूर जायचे असेल तरी जात तुमचा पिच्छा सोडत नाही."[][]

गेल्या काही दशकांत आर्थिकदृष्ट्या प्रस्थापित झालेले अभिजन दलित, प्रतिकांमध्ये अडकलेले दलित, स्वत:मध्ये मश्गूल असलेले स्वकेंद्री दलित आणि मूलगामी परिवर्तनाची आशा बाळगणारे रॅडिकल दलित, अशा चार प्रकारे सूरज यांनी दलितांचे वर्गीकरण या पुस्तकात केलेले आहे.[][]

हे वर्गीकरण करत असताना सूरज यांनी म्हटलेय की प्रस्थापित दलित हे दलितांमधील आर्थिक-सामाजिक-राजकीयदृष्ट्या अधिक मागासलेल्या दलित समूहांवर आपल्याला हवे ते जातीविषयक संकेत लादतात. त्यामुळे दलितांची एकत्रित ताकद तयार न होता, दलितांमध्येच फूट निर्माण होते.[][]

संदर्भ

  1. ^ https://books.google.co.in/books/about/Caste_Matters.html?id=vn2jDwAAQBAJ&source=kp_book_description&redir_esc=y
  2. ^ "आंबेडकरांना सगळे स्वीकारतात, पण त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाला नाही: सूरज येंगडे" – www.bbc.com द्वारे.
  3. ^ "'वामपंथ और दक्षिणपंथ के ध्रुवीकरण की शिकार दलित राजनीति'" – www.bbc.com द्वारे.
  4. ^ "आंबेडकरांना सगळे स्वीकारतात, पण त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाला नाही: सूरज येंगडे" – www.bbc.com द्वारे.
  5. ^ "'वामपंथ और दक्षिणपंथ के ध्रुवीकरण की शिकार दलित राजनीति'" – www.bbc.com द्वारे.
  6. ^ "आंबेडकरांना सगळे स्वीकारतात, पण त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाला नाही: सूरज येंगडे" – www.bbc.com द्वारे.
  7. ^ "'वामपंथ और दक्षिणपंथ के ध्रुवीकरण की शिकार दलित राजनीति'" – www.bbc.com द्वारे.