"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
==संदर्भ == |
==संदर्भ == |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
==बाह्य दुवे== |
|||
* [https://indianexpress.com/profile/columnist/suraj-yengde/ Indian Express मधील स्तंभलेखन] |
|||
[[वर्ग:भारतीय संशोधक]] |
[[वर्ग:भारतीय संशोधक]] |
१४:३१, २१ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती
सूरज येंगडे हे एक भारतीय संशोधक, वकील, व लेखक आहेत. ते मूळचे नांदेडचे असून अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करत आहेत.[१] ते नेहमी सुटाबुटात वावरतात, व त्यांची आफ्रिकन हेअरस्टाईल आहे.[२]
बालपण व प्राथमिक शिक्षण
सूरज येंगडे नांदेडच्या भीमनगरमधील बौद्ध वस्तीत वाढले. दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात वाढताना त्यांनी शाळकरी वयापासून शेतमजूर, ट्रकवरती हेल्पर अशी कामे करत शिक्षण पूर्ण केले. त्यांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये झाले. त्यानंतर काही दिवस मुंबईमध्ये शिक्षण घेऊन ते शिष्यवृत्ती घेऊन परदेशी शिक्षणासाठी रवाना झाले.[३]
उच्च शिक्षण व संशोधन
त्यांनी आफ्रिका, युरोप आणि अमेरिका या खंडांमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते अमेरिकेतील बोस्टनमध्ये हार्वर्ड विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणजे संशोधक म्हणून काम करत आहे. जात, वर्णभेद, वंश हा सूरजच्या अभ्यासाचा विषय आहे.[४][५]
आफ्रिकन विद्यापीठातून पीएचडी मिळवणारे ते पहिले दलित स्कॉलर आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली आहे.[६][७]
इंग्लंडमध्ये शिकत असताना इतर भारतीय विद्यार्थ्यांकडून त्यांना "दलित" म्हणून जातिभेदाचा अनुभव आला आहे. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर बीबीसी मराठीसोबत त्यांनी परदेशातही जात पाठ कशी सोडत नाही हा अनुभव मांडला होता. माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना अशाप्रकारच्या अशाप्रकारच्या त्रासातून जावे लागत असून सातासमुद्रापारही जात पिच्छा सोडत नाही असे येंगडे यांनी सांगितले आहे.[८][९]
लेखन
त्यांनी 'कास्ट मॅटर्स' हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे.[१०]
'द रॅडिकल इन आंबेडकर' हे पुस्तक सूरजने आनंद तेलतुंबडे यांच्यासोबत संपादित केले आहे. दलित, ब्लॅक, रोमा, इराकु आणि जगभरातील स्थलांतरित यांना एकत्रित आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे.[११]
संदर्भ
- ^ https://scholar.harvard.edu/surajyengde/about
- ^ https://www.bbc.com/marathi/india-49673283

- ^ https://www.bbc.com/marathi/india-48523216
- ^ https://www.bbc.com/marathi/india-49673283
- ^ https://www.bbc.com/marathi/india-49673283
- ^ https://www.bbc.com/marathi/india-49673283