"शिवाजी महाराजांबद्दल व्यक्त झालेली मते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
हा मजकूर "शिवाजी महाराज" लेखातून येथो हलवण्यात आला आहे; संदर्भांची गरज आहे
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

१३:१८, १ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती

शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय

  • काफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे.
  • इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड्‌समध्ये म्हटले आहे की शिवाजी स्त्रियांना अभय देतो हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून पळून जात.
  • शिवाजीच्या समकालीन इंग्रज, डच, फ्रेन्च, पोर्तुगीज आणि इटालियन प्रवाशांनी शिवाजीची तुलना जगाच्या इतिहासात अजरामर झालेल्या ॲलेक्झांडर, हॅनिबल, ज्युलियस सीझर, सरटोरियस यांच्याशी केली आहे. पण या थोर व्यक्तींमध्ये शौर्याव्यतिरिक्त दोषही होते. शिवाजी सर्वगुणसंपन्‍न होता. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. पाश्चात्त्य राज्यकर्त्यांमध्ये दिसून येणाऱ्या राज्यलोभ, आसक्ती, व्यसनाधीनता द्वेष. लंपटपणा अशा अवगुणांपासून शिवाजीचे जीवन अलिप्त होते.

शिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके

  • पुस्तकाचे नाव : शिवदिग्विजय (रचनाकाळ- इ.स. १८१८). टीकेचा तपशील :-

"शिवाजीची पत्‍नी सोयराबाई हिने आपल्या पतीवर विषप्रयोग केला, आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला."

  • पुस्तकाचे नाव : अनुपुराण. या काव्याचा कवी- परमानंदाचा नातू गोविंदा. काव्याचा रचनाकाळ- इ.स. १७४५. टीकेचा तपशील :-

"शिवाजीची पत्‍नी सोयराबाई ही कलीची दूती असलेली राक्षसी होती. तिने केलेली सर्व कृत्ये स्वार्थापोटी केली होती. स्वाभिमान राखण्यासाठी व आपल्या शौर्याला वाट करून देण्यासाठी संभाजी मोगलांना मिळाला"
’अनुपुराण’ विश्वासार्ह नसल्याचे जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई यांनी म्हटले आहे.
सोयराबाईचा सवतीमत्सर, राजकारणातील तिची लुडबूड, शिवाजी महाराजांचे नैराश्य व बायकोच्या तंत्राने वागण्याची प्रवृत्ती या ’अनुपुराणा’ने सांगितलेल्या गोष्टींचे पडसाद रणजित देसाईंनी लिहिलेल्या ’श्रीमान योगी’ या पुस्तकात पडले आहेत.

  • पुस्तकाचे नाव : डच संग्रहातील डाग रजिस्टर (इ.स. १८८०; पृष्ठ क्रमांक ७२४ ते ७२९ पानांवरच्या २३-१०-१६८० च्या नोंदी). टीकेचा तपशील :-

"गोवळकोंड्याहून आताच बातमी आली, की शिवाजीच्या दुसऱ्या बायकोने शिवाजीवर विषप्रयोग केला असावा आणि आणि तिचा लहान मुलगा राजाराम याला गादीवर बसविण्याचा घाट घातला होता. त्याला तुरुंगात टाकले आहे आणि थोरला मुलगा संभाजी राज्य करीत आहे."

  • पुस्तकाचे नाव : मनुचीने लिहिलेला ग्रंथ- ’स्टोरिया द मोगोर’ (खंड २ रा, पृष्ठ २३२). टीकेचा तपशील :-

"संभाजीविरुद्ध अनेक अधिकाऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या, व शिवाजीस भीती पडली की त्या वेळीच थांबवल्या नाहीत तर राज्यातील प्रधान व अधिकारी बंड करतील. त्यामुळे शिवाजीने संभाजीस कैद करून एका किल्ल्यावर ठेवण्याचे ठरविले आणि धाकट्या मुलास आपल्यामागे राज्य देण्याचे निश्चित केले. पण संभाजीस आपल्या बापाच्या आज्ञांचा सुगावा लागला आणि त्याने वेळीच पलायन केले आणि आश्रयासाठी औरंगजेबाचा दरबार गाठला. घरच्या भांडणावर पडदा टाकण्यासाठी शिवाजीने संभाजीला मोगलांकडे पाठविले नव्हते."

  • मुंबईकर इंग्रजांच्या २८-४-१६८०च्या पत्रातील माहिती :-

"शिवाजीच्या निधनाची निश्चित बातमी मिळाली. त्याला रक्ताची जोरात उलटी झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला."

  • ’मासिरे आलमगीर’ या पर्शियन लेखातील माहिती :-

"शिवाजी घोड्यावरून उतरला व अतिउष्णतेमुळे रक्ताची दोन वेळा उलटी झाल्याने तो मरण पावला."

  • इगेन वी या लेखकाच्या पुस्तकातील मजकूर :-

"शहाजी हा निजामाच्या राज्याचा सेवक होता आणि त्याने पुणा परगणा दादोजी कोंडदेवावर सोपवून टाकला होता."
हे तर्कट कोणत्याही कागदपत्रांत सापडत नाही. खरी गोष्ट अशी होती की "कर्नाटकातील आदिलशाही अत्याचाराने शहाजी अत्यंत व्यथित झाला होता. आदिलशहा, निजामशाहा आणि मोगल यांच्याकडे त्याने नोकऱ्या पत्करल्या. पण अविवेकी लहरी सुलतानी दरबारांतील हिंदुद्वेषी खुनशी मुसलमान सरदार, जनानखान्यातील कपट कारस्थाने या सर्वांमुळे शहाजीच्या निष्ठेचे कुठेच मोल नव्हते. त्यामुळे त्याने शिवाजीला सह्याद्रीने वेढलेल्या महाराष्ट्रात पाठविले व त्याच्याकडून आपल्या हयातीतच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. शहाजीला याची किंमतही मोजावी लागली. इ.स. १६४८ व १६६३मध्ये त्याला दोनदा कैद भोगावी लागली. दोन्ही वेळा शहाजी कैदेतून सहीसलामत सुटला. मात्र आदिलशहाने सिद्दी जौहर, सिद्दी यातून, मसूद आणि बहलोलखान या सरदारांना जबर शिक्षा केल्या. शहाजीला अशी शिक्षा करण्याचे आदिलशहाला धाडस झाले नाही, कारण शिवाजी बळ एवढे वाढले होते की, मोगलांविरुद्ध लढण्यासाठी शिवाजीची मदत घेण्याचे आदिलशहाने ठरविले होते. असा तहही त्याने केला होता.

  • व्हलेंटाइन, ग्रॅन्ट डफ, जे स्कॉट या इंग्रज इतिहासकारांची पुस्तके : टीकेचा तपशील :-

"अफझलखानाला शिवाजीने विश्वासघाताने मारले"

  • बंगाली इतिहासकार जदुनाथ सरकार यांचे पुस्तक : टीकेचा तपशील :-

"शिवाजी अक्षरशत्रू होता, त्याला मुळीच लिहिता वाचता येत नव्हते."
या इंग्रजी आणि बंगाली इतिहासकारांनी केलेल्या विधानांना वि.का. राजवाडे, शेजवलकर, सेतुमाधव पगडी, दत्तो वामन पोतदार आणि डॉ. बाळकृष्ण या नामवंत संशोधकांनी पुराव्यांसहित समर्पक उत्तरे देऊन अशा आक्षेपांतील फोलपणा सिद्ध केला आहे.

  • भारतात असकारितेची चळवळ चालू होती त्या काळातील इंग्रजी वृत्तपत्रांतून प्रकट होणारी तत्कालीन भारतीय राजकारण्यांची मते :-

" अफझुलखानाचा वध आणि सुरतेची लूट हे शिवाजीच्या हातून घडलेले अक्षम्य गुन्हे आहेत."
साहित्यसम्राट न.चिं. केळकरांनी असल्या विधानांचा खरपूस समाचार घेतला होता.

  • उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील सय्यद तफझुल दाऊद सईदखान नावाच्या वकिलाने इ.स. १९३५ साली ’रिअल शिवाजी’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यात एका डच पत्रातील उल्लेख छापून शिवाजीराजांची प्रतिमा डागाळेल अशा तऱ्हेची शिवाजीच्या कुटुंबातील स्त्रियांसंबंधांत खोटीनाटे बदनामीकारक विधाने केली होती. भालजी पेंढारकरांनी या विरुद्ध कोल्हापुरात बंड पुकारले होते. कोल्हापूर संस्थानचे दिवाण रावबहादूर डी,ए, सुर्वे यांनी या पुस्तकावर बंदी घातली आणि जनतेच्या रोषाला आवर घातला. सय्यदच्या या पुस्तकातील मजकुराचे खंडन डॉ.बाळकृष्ण यांनी त्यांच्या ’शिवाजी द ग्रेट’ या ग्रंथात केले आहे.
  • पंडित नेहरूंच्या ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात "शिवाजी हा एक दरवडेखोर आणि लुटारू होता" असे म्हटले आहे.

संदर्भ