Jump to content

"दिव्यांग साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''अखिल भारतीय दिव्यांग संमेलन''' नावाचे एक साहित्य संमेलन २४ मार्च...
(काही फरक नाही)

२१:५३, ९ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

अखिल भारतीय दिव्यांग संमेलन नावाचे एक साहित्य संमेलन २४ मार्च २०१८ रोजी नाशिक येथे भरले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध पंजाबी कवयित्री इंदरजीत नंदन या होत्या. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात ग्रंथदिंडी, कथाकथन, परिसंवाद, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखती, खुले चर्चासत्र असे भरगच्च कार्यक्रम होते.

'दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा (२०१६)' या विषयावर मुंबईचे विजय कान्हेकर, पुण्याचे संजय जैन आणि नंदकुमार फुले, गुजराथचे रणजीत गोयल, उत्तर प्रदेशातील पियुषकुमार द्विवेदी ह्यांनी आपले विचार मांडले.


पहा : साहित्य संमेलने