दिव्यांग साहित्य संमेलन
Appearance
अखिल भारतीय दिव्यांग संमेलन नावाचे एक साहित्य संमेलन २४ मार्च, २०१८ रोजी नाशिक येथे भरले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी पंजाबी कवयित्री इंदरजीत नंदन या होत्या. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात ग्रंथदिंडी, कथाकथन, परिसंवाद, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखती, खुले चर्चासत्र असे कार्यक्रम होते.
'दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा (२०१६)' या विषयावर मुंबईचे विजय कान्हेकर, पुण्याचे संजय जैन आणि नंदकुमार फुले, गुजराथचे रणजीत गोयल, उत्तर प्रदेशातील पियुषकुमार द्विवेदी ह्यांनी आपले विचार मांडले.