"एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन लेख खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
०२:१९, ८ जानेवारी २०२० ची आवृत्ती
एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर ही अँड टिव्ही चॅनेलवर प्रसारित होणारी एक ऐतिहासिक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे. ही मालिका भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहे. मालिका इम्तियाज पंजाबी द्वारे दिग्दर्शित, स्मृती शिंदे यांच्या एसओबीओ फिल्म्स द्वारे निर्मित आणि मालिक शांती भूषण यांनी तीचे लेखन केल आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये आंबेडकरांच्या जीवनावर आधारित नवीन हिंदी मालिका सुरू करण्याची घोषणा झी एंटरटेनमेंटचे सहायक हिंदी टीव्ही चॅनेल अँड टीव्हीने केली होती. १७ डिसेंबर २०१९ पासून या मालिकेचे अँड टीव्ही चॅनेलवर प्रसारण होत आहे. बालकलाकार आयुध भानुशाली आंबेडकरांच्या बालपणीची भूमिका साकारत आहेत, तर या कथा पुढे गेल्यानंतर अभिनेते प्रसाद जावडे हे मुख्य भूमिका साकारतील. ही मालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणादायी कथा आहे, या मालिकेत त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून ते भारतीय राज्यघटनेचे लेखक होण्यापर्यंतचा प्रवास दर्शवला जात आहे. आंबेडकरांच्या जीवनावर निघालेली ही पहिली हिंदी मालिका आहे. ही मालिका प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री ८:३० वाजता, 22 मिनिटांच्या भागांसह प्रसारित होत असते.