"आनंद कुंभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: आनंद नागप्पा कुंभार (जन्म : सोलापूर, २७ मे १९४१; मृत्यू : २८ ऑक्टोबर... |
(काही फरक नाही)
|
२२:५९, १ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
आनंद नागप्पा कुंभार (जन्म : सोलापूर, २७ मे १९४१; मृत्यू : २८ ऑक्टोबर २०१९) हे एक शिलालेख संशोधक, शिलालेख वाचक होते. त्यांनी कुडलसंगम येथे असलेला मराठी भाषेतील सर्वात जुना शिलालेख सापडवला.
आनंद कुंभार यांचे शिक्षण सोलापुरातील डी. एच. खजिनदार स्कूल, नगरपालिकेची शाळा व नाईट हायस्कूल अशा तीन शाळांत झाले. कन्नड, १९६० ते १९६४ या काळात ते भारतीय सैन्यदलाच्या तोफखान्यात बिनतारी संदेशांच्या देवाणघेवाणीचे काम करीत होते. १९६५ ते १९६९ या काळात त्यांनी सोलापूरमधील तत्कालीन खासगी वीज कंपनीत रोजंदारीवर मीटर रीडरचे काम केले. घरी पिढीजात कूंभारकला असल्याने ते त्या कामात घरच्यांना मदत करीत.
आनंद कुंभार यांना पहिल्यापासूनच पुस्तके, नियतकालिके वाचण्याची आवड होती. विदर्भ संशोधन मंडळाच्या वार्षिकांतले इतिहास संशोधनविषयक लेख वाचून त्यांना त्या विषयात रुची निर्माण झाली. डाॅ. वा.वि. मिराशी यांचे ताम्रपट, शिलालेख व प्राचीन नाणी या विषयांवर लेख वाचून ते मिराशींना भेटले व ह्या विषयात काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. मिराशींनी त्यासाठी इंग्रजी भाषेत गती, संस्कृतचे ज्ञान व प्राचीन लिप्यांचा अभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले. आनंद कुंभारांना यांतले काहीच येत नव्हते. मग ते आधी शाळाबाह्य रीतीने एस.एस.सी पास झाले, व ग्रंथांनाच गुरू मानून त्यांनी अभ्यास सुरू केला. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळातील तात्यासाहेब खरे (ग.ह. खरे) यांना ते भेटले आणि त्यांच्याकडून शिलालेखांचा अभ्यास कसा करावा याचे धडे घेतले. शिलालेखांचे ठसे कसे घ्यावेत याचॆ ज्ञान घेतले.
सोलापूर क्षेत्राची निवड
आपल्या पुराभिलेखांच्या अभ्यासासाठी आनंद कुंभार यांनी सोलापूर क्षेत्र निवडले. सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ तालुके आहेत दर शनिवार-रविवारी भटकंती करून कुंभारांनी ४ तालुक्यांत सर्वेक्षण करून शिलालेखांचे ठसे घेतले. मराठी, हिंदी, इंग्रजी, फारसी व संस्कृत भाषा ह्यांचे कामचलाऊ ज्ञान मिळवून, देवनागरीबरोबरच मोडी, कन्नड व ब्राह्मी लिपीतील मजकूर वाचू शकण्याइतपत त्यांनी प्रगती केली. कन्नड भाषेतील लेखांचे वाचन करण्यासाठी त्यांना धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठातील दाॅ. रित्ती यांची खूप मदत झाली. दोघांच्या सहकार्यातून व प्रयत्नांतून अज्ञात माहिती मिळू लागली. त्या माहितीवर आधारलेला 'इन्स्क्रिप्शन्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट' हा संशोधनपर ग्रंथ कुंभार-रित्ती या जोडनावाने प्रसिद्ध झाला.
आनंद कुंभार यांचे प्राकाशित साहित्य
- 'इन्स्क्रिप्शन्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट' हा ग्रंथ
(अपूर्ण)