Jump to content

"खेळ विषयावरील चित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: क्रीडाप्रकार किंवा मैदानी खेळ ह्या विषयाची पार्श्वभूमी असलेले...
(काही फरक नाही)

१२:४६, १४ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

क्रीडाप्रकार किंवा मैदानी खेळ ह्या विषयाची पार्श्वभूमी असलेले फारच थोडे भारतीय कथापट आहेत. मराठीत तर जवळजवळ नाहीतच, आहेत ते हिंदीत. अशा चित्रपटांचा हा परिचय :-

अनेक वर्षांपूर्वी, देव आनंद नायक आणि माला सिन्हा नायिका असलेला 'लव्ह मॅरेज' नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातला नायक क्रिकेट खेळाडू होता, पण तो प्रत्यक्ष क्रिकेट खेळताना दाखवला नव्हता.

कुमार गौरवने क्रिकेट ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या एका हिंदी चित्रपटात काम केले होते. (नाव आठवत नाही!)

शाहरूख खान हा नायक असलेला संपूर्णपणे हाॅकीकेंद्रित चित्रपट म्हणजे 'चक दे इंडिया'. या चित्रपटात सर्व महिला भारतातील विविध राज्यांधून आलेल्या खेळाडू होत्या. सर्वांनी एकजुटीने खेळून आंतरराष्ट्रीय हाॅकीत अजिंक्यपद मिळवले, ती कथा अतिशय रोचक आहे. या विजयानंतर शाहरूख खानावरील देशद्रोहाचा आरोप तर पुसला जातोच, पण एका महिला खेळाडूच्या वाग्दत्त वराच्या अहंकारी स्वभावाला 'हम किसीसे कम नहीं' असा जोरदार प्रतिजवाब मिळतो.

अक्षयकुमारचा 'गोल्ड' हा कथापट हाॅकीविषयावरच होता.

धावपटू मिल्खा सिंगच्या जीवनावरील 'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट एक अतिशय परिणामकारक चरित्रपट चित्रपट होता. विशेष म्हणजे तो मिल्खासिंगच्या जीवितकालातच बनला होता.

क्रिकेटच्या खेळाडूंचाया अंधविश्वास कसा असतो हे दाखवणारा क्रिकेटाधारित चित्रपट म्हणजे 'द जोया फॅक्टर'. त्याल एक खेळाडू खेळताना फक्त लाल रंगाचा रुमाल खिशात ठेवतो, तर दुसरा, जी अंडरवेअर घालून धावांचे पहिले शतक केले, तीच अंडरवेअर धुवून धुवून घालतो. काही खेळाडू शतक झाल्यावर दोन्ही हात आकाशाकडे करून देवाचे आभार मानतात, तर काहीजण जमिनीवर माथा टेकतात, तर काही नमाज ठोकतात. फुटबाॅलपटू मॅरिडोनाचा हात एकदा खेळताना फुटबाॅलला लागला, पण ते रेफरीच्या लक्षात आले नाही. त्या हाताला मॅरिडोनाने 'देवाचा हात' म्हटले.

राणी मुखर्जी ही 'हइशा' चित्रपटात पुरुषी कपडे घालून क्रिकेट खेळतॆे, कारण तिच्या गावात मुलींना क्रिकेट खेळायची बंदी असते.


(अपूर्ण)