"शकुंतलादेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शकुंतलादेवी (जन्म : ४ नॊव्हेंबर १९२९; मृत्यू : २१ एप्रिल २०१३) हिला...
(काही फरक नाही)

११:५२, २८ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

शकुंतलादेवी (जन्म : ४ नॊव्हेंबर १९२९; मृत्यू : २१ एप्रिल २०१३) हिला ह्यूमन काॅम्पूटर म्हणून ओळखले जाते.

शकुंतलादेवीचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन वर्षाच्या शकुंतलाला पत्त्याचे खेळ शिकवताना तिच्या अफाट स्मरणशक्तीचे त्यांना ज्ञान झाले. त्यांनाच शकुंतलादेवीमधील झपाट्याने गुणाकार-भागाकार करण्याची शक्तीची पहिल्यांदा ओळख पटली. सर्कस सोडून ते शकुंतलाचेच रोडशो करू लागले. वयाच्या ६व्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले.

इ.स. १९७७मध्ये डलास विद्यापीठात शकुंतलाचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद काॅम्प्यूटर 'युनिव्हॅक'शी झाला. तेथे शकुंतलादेवीने एका २०१ अंकी संख्येचे २३वे मूळ ५० सेकंदात काढले व फळ्यावर लिहिले. हे मूळ काढायला काॅम्प्यूटरला ६२ सेकंद लागले.

चित्रपट

शकुंतलादेवीवरील एका हिंदी चित्रपटाची निर्मिती लंडनमध्ये सुरू आहे (१६ सप्टेंबर २०१९ची बातमी). शकुंतलादेवीचे काम विद्या बालन करीत आहे.