Jump to content

शकुंतलादेवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शकुंतलादेवी (जन्म : ४ नॊव्हेंबर १९२९; - २१ एप्रिल २०१३) हिला ह्यूमन काॅम्पूटर म्हणून ओळखले जाते.

शकुंतला देवी
जन्म ४ नोव्हेंबर १९२९ (1929-11-04)
बंगलोर
मृत्यू २१ एप्रिल, २०१३ (वय ८३)
बंगलोर
राष्ट्रीयत्व भारतीय
जोडीदार
परितोष बॅनर्जी
(ल. १९६४; घ. १९७९)
अपत्ये


४ नॊव्हेंबर १९२९ला बंगलोरमध्ये शकुंतलादेवी यांचा जन्म झाला. त्यांच कुटुंब म्हणजे पारपंपिक कन्नड ब्राह्मण .पण शकुंतला देवी यांचे वडील नव्या युगातले,त्यांनी आपल्या भिक्षुकीच्या पारंपरिक व्यवसायाला आणि मंदिरातील परंपरागत पुजारी होण्याला नकार देऊन सर्कस मधील आडवाटेवरची नोकरी धरली .

शकुंतलादेवीचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन वर्षाच्या शकुंतलाला पत्त्याचे खेळ शिकवताना तिच्या अफाट स्मरणशक्तीचे त्यांना ज्ञान झाले. त्यांनाच शकुंतलादेवीमधील झपाट्याने गुणाकार-भागाकार करण्याची शक्तीची पहिल्यांदा ओळख पटली. सर्कस सोडून ते शकुंतलाचेच रोडशो करू लागले. वयाच्या ६व्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले.

शकुंतला देवी १९४४ मध्ये लंडनला गेल्या .लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले.१९७६ साली आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली.

इ.स. १९७७मध्ये डलास विद्यापीठात शकुंतलाचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद काॅम्प्यूटर 'युनिव्हॅक'शी झाला. तेथे शकुंतलादेवीने एका २०१ अंकी संख्येचे २३वे मूळ ५० सेकंदात काढले व फळ्यावर लिहिले. हे मूळ काढायला काॅम्प्यूटरला ६२ सेकंद लागले.

१८ जून १९८० मध्ये त्यांना ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ ह्या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या .हे आकडे लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडलेले होते .शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदामध्ये १८९४७६६८१७७९९५४२६४६२७७३७३० हे उत्तर दिले. १३ आकडी दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त २८ सेकंदात पूर्ण केला.त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि शकुंतला देवी याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये विराजमान झाले.

शकुंतलादेवी यांच्या अंगी एक अदभुत प्रतिभा होती की अख्ख्या भारतास त्याची दाखल घ्यावी लागली . गुगलने त्यांच्या पहिल्या जयंतनिमित्त डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती.

भारतात परतल्यावर १९८८ मध्ये त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलीिोर्निया विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागाचे विशेष आमंत्रण आले. या विभागातील प्रा.आर्थर जेनसन यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. प्रा.आर्थर जेनसन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले.कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येच घनमूळ काढणे किवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा सातवा किवा आठवा घात काढायला सांगण्याची खोटी की शकुंतला देवी यांचे उत्तर हजर असायचे.

२०१३ सालच्या एप्रिल महिन्यात,वयाच्या ८३ व्या वर्षी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा जगप्रसिद्ध ह्युमन कॉम्प्युटर काळाच्या पडद्याआड झाला.

चित्रपट

[संपादन]

शकुंतलादेवीवरील एका हिंदी चित्रपटाची निर्मिती लंडनमध्ये सुरू होती. (१६ सप्टेंबर २०१९ची बातमी). शकुंतलादेवीचे काम विद्या बालन यांनी केले आहे. चित्रपट २०२० साली प्रकाशित झाला..