Jump to content

"सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:
वाघांप्रमाणेच सिंहांची शिकार हा स्वातंत्र्यपूर्व काळात राजेमहाराजांचा छंद होता. जुनागडच्या नवाबाने मात्र विसाव्या शतकाच्या प्रारंभी सिंहांच्या शिकारींवर पूर्णत: बंदी घातली. त्याकाळी सिंहांची संख्या तेरावर आली होती, अशी एक आकडेवारी सांगितली जाते. मात्र ही संख्या नेहमीच वादग्रस्त राहिली. काहींच्या मते प्रत्यक्षात ती संख्या शंभराच्या आसपास होती. ते काहीही असले, तरी १९१० पर्यंतच्या काळात हे संकट ओळखले गेले. साहजिकच त्यापुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंहांनाही अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या यादीत टाकण्यात आले आणि त्यादृष्टीने काही पावले उचलली गेली. गुजरातेतले [[गीर अभयारण्य|गीर]] हे सिंहांसाठी संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आले. गीरमधील सिंहांना आशियाई सिंहांप्रमाणेच इंडियन लायन असेही म्हणतात. आज २०१० साली गीरमध्ये ४११ सिंह आहेत. १९१० ते २०१० या काळात ३९८ सिंह वाढले.

आफ्रिकेतील जंगलात सिंहांची संख्या जास्त आढळते.
आफ्रिकेतील जंगलात सिंहांची संख्या खूप जास्त आहे.

== आशियाई सिंह पुनर्निवास योजना ==
== आशियाई सिंह पुनर्निवास योजना ==
ओळ ४७: ओळ ४७:

==संस्कृत काव्यातले सिंह==
==संस्कृत काव्यातले सिंह==
लोकमान्य टिळकांचे वर्तमान पत्राचे नाव 'केसरी' हे सिंहाचेच पर्यायी नाव आहे. वर्तमानपत्रावर कधीकाळी असलेला श्लोक :
लोकमान्य टिळकांचे वर्तमान पत्राचे नाव 'केसरी' हे सिंहाचेच पर्यायी नाव आहे. ह्या वर्तमानपत्रावर कधीकाळी असलेला श्लोक :

गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी। मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।

गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी। मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।

ओळ ६३: ओळ ६३:
मराठी समश्लोकी काव्यानुवाद [[वासुदेव वामन खरे|वासुदेवशास्त्री खरे]] यांचा आहे.
मराठी समश्लोकी काव्यानुवाद [[वासुदेव वामन खरे|वासुदेवशास्त्री खरे]] यांचा आहे.

==संस्कृत काव्यांतील सिंहासंबंधी अन्य श्लोक==
==संस्कृत काव्यांतील सिंहासंबंधी काही अन्य श्लोक==
१. न यत्र स्थेमानं दधुरतिभयभ्रान्तनयना-

१. न यत्र स्थेमानं दधुरतिभयभ्रान्तनयना-

गलद्दानोद्रेकभ्रमदलिकदम्बा: करिटिन:।

गलद्दानोद्रेकभ्रमदलिकदम्बा: करिटिन:।

ओळ ८२: ओळ ८२:

वगैरे वगैरे.
वगैरे वगैरे.

==सिंह या विषयावरील मराठी पुस्तके==
* सिंह ([[अतुल धामनकर]])

==प्रतिमा==
==प्रतिमा==

१४:२९, १३ जुलै २०१९ ची आवृत्ती

sinha
नर
नर
मादा (सिंव्हीण)
मादा (सिंव्हीण)
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: मार्जार कुळ(फेलिडे)
जातकुळी: पँथेरा
जीव: पँथेरा लिओ
सिंहाचा अफ्रिकेतील आढळप्रदेश
सिंहाचा अफ्रिकेतील आढळप्रदेश
इतर नावे
Felis leo
Linnaeus, 1758

सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. तो मांसभक्षक प्राणी आहे. सिंहाचे शास्त्रीय नाव 'पँथेरा लिओ' आहे. शूर माणसाला सिंहाची उपमा देतात.

जगभरात आशियाई किंवा आफ्रिकन या दोन प्रकारचे सिंह आढळतात. आशियाई सिंहांचे अस्तित्व हे पूर्वापार भारतातच राहिले असून गेल्या काही वर्षांपासून तर ते गीरपुरतेच उरले आहे. आशियाई सिंह एकेकाळी ग्रीसपासून मध्य भारतात बिहारपर्यंत होते. पण शिकारीमुळे ते आता फक्त गीर जंगलात मिळतात. परंतु काही संशोधक लेखकांच्या मते सिंह हा मूळचा भारतातील नसून तो बाहेरून भारतात आणाला गेला व त्यामुळेच त्यांची संख्या इतकी कमी आहे.[]

वाघांप्रमाणेच सिंहांची शिकार हा स्वातंत्र्यपूर्व काळात राजेमहाराजांचा छंद होता. जुनागडच्या नवाबाने मात्र विसाव्या शतकाच्या प्रारंभी सिंहांच्या शिकारींवर पूर्णत: बंदी घातली. त्याकाळी सिंहांची संख्या तेरावर आली होती, अशी एक आकडेवारी सांगितली जाते. मात्र ही संख्या नेहमीच वादग्रस्त राहिली. काहींच्या मते प्रत्यक्षात ती संख्या शंभराच्या आसपास होती. ते काहीही असले, तरी १९१० पर्यंतच्या काळात हे संकट ओळखले गेले. साहजिकच त्यापुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंहांनाही अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या यादीत टाकण्यात आले आणि त्यादृष्टीने काही पावले उचलली गेली. गुजरातेतले गीर हे सिंहांसाठी संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आले. गीरमधील सिंहांना आशियाई सिंहांप्रमाणेच इंडियन लायन असेही म्हणतात. आज २०१० साली गीरमध्ये ४११ सिंह आहेत. १९१० ते २०१० या काळात ३९८ सिंह वाढले.

आफ्रिकेतील जंगलात सिंहांची संख्या खूप जास्त आहे.

आशियाई सिंह पुनर्निवास योजना

सिंहाचे शिकार करतानाचे छायाचित्र

या योजनेनुसार कुनो पालपूर या जंगलात गीरचे काही सिंह पुनर्निवासित केले जातील. पण गुजरात सरकारचा या योजनेला विरोध आहे. कुनो पालपूर येथे वाघ असल्यामुळे गुजरात सरकारने या योजनेला विरोध केला. वाघ हा प्राणी सिंहापेक्षा तगडा असतो आणि वजनदारपण आसतो. कुनो पालपूरला नेल्यावर तिथले वाघ सिंहाची शिकार करू शकेल. पण सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे गुजरातला काही सिंह आता कुनो पालपूर या अभयारण्यास देणे भाग पडणार आहे. तरीसुद्धा गुजरात सरकारचा दावा आहे की या निर्णयाकडे सर्वोच्च न्यालयाने पुन्हा एकदा नजर द्यावी.सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो.

वर्णन

१५० ते २५० किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्व १०००० वर्षांपासून आशिया आणि आफ्रिकामध्ये आढळते. सिंहाचे दोन प्रकार शिल्लक आहेत आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह. पूर्वी अस्तित्वात असलेले युरोपियन सिंह आणि बारबेरी सिंह हे सिंह आता नामशेष झाले आहेत. पांढरा सिंह हा दक्षिण आफ्रिकेत मिळतो. त्याचे सरासरी आयुष्य १० ते १४ वर्ष असते. ते लहान झुडुपाच्या सवाना जंगलात आढळतात. एकट्याने राहण्यापेक्षा एखाद-दुसऱ्या सवंगड्याबरोबर तो राहतो. चितळ, हरीण, काळवीट, नीलगाय, रानडुक्कर इत्यादी प्राणी हे सिंहांचे खाद्य आहे. सिंहांना अंदाजे चार प्रयत्‍नांनंतर एक शिकार हाती लागते, असे म्हणतात. सिंह दिवसातील वीस तास झोपतात.

भारताच्या राष्ट्रचिन्हावर चार दिशेला तोंड करून उभे असलेले चार सिंह आहेत. मुळात हे सिंह राजा अशोकाच्या 'अशोक स्तंभा'वर होते.

मेट्रो गोल्डविन मेयर या अमेरिकन फिल्म स्टुडियोने बनविलेल्या चित्रपटाची सुरुवात गरजणाऱ्या सिंहाने होत असे.

संस्कृत काव्यातले सिंह

लोकमान्य टिळकांचे वर्तमान पत्राचे नाव 'केसरी' हे सिंहाचेच पर्यायी नाव आहे. ह्या वर्तमानपत्रावर कधीकाळी असलेला श्लोक :

गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी। मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।
नखाग्रांनी येथे गुरुतर शिला भेदुनि करीं। भ्रमाने आहे रे गिरिकुहरि हा निद्रित हरी॥ (मूळ जगन्नाथ पंडित, अनुवाद वासुदेवशास्त्री खरे)

यातला झोपलेला सिंह म्हणजे हिंदुस्थानची जनता. आणि मदान्धाक्ष मित्र म्हणजे राज्यकर्ते ब्रिटिश सरकार.

मूळ श्लोक जगन्नाथ पंडिताच्या भामिनीविलास या काव्यात आला आहे. तो असा :

स्थितिं नो रे दध्या: क्षणमपि मदान्धेक्षण सखे।
गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवि।
असौ कुम्भिभ्रान्त्या खरनखरनिर्दारितमहा-
गुरुग्रावग्राम: स्वपिति गिरिगर्भे हरिपति:॥

मराठी समश्लोकी काव्यानुवाद वासुदेवशास्त्री खरे यांचा आहे.

संस्कृत काव्यांतील सिंहासंबंधी काही अन्य श्लोक

१. न यत्र स्थेमानं दधुरतिभयभ्रान्तनयना-
गलद्दानोद्रेकभ्रमदलिकदम्बा: करिटिन:।
लुठन्मुक्ताभारे भवति परलोकं गतवतो
हरेरद्य द्वारे शिव शिव शिवानां कलकल:॥

ज्यांच्या गंडस्थलांच्या उद्रेकांभोवती भुंग्यांचे थवे गुंजत आहेत असे मत्त हत्तीहि जेथे भीतीमुळे डोळे फिरवीत होते आणि उभे राहू शकत नव्हते अशा सिंहाच्या (हत्तींच्या गंडस्थलातील) मोत्यांनी खचाखच भरलेल्या प्रांगणात आता तो सिंह आता परलोकी गेल्यामुळे कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकावी लागत आहे. शिव! शिव!

२. सिंह: शिशुरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु।
प्रकृतिरियं सत्त्ववतां न खलु वयस्तेजसो हेतु:॥

सिंहाचा छावा जरी असला तरी तो मदाने गंडस्थलांच्या भिंती ओल्या झाल्या आहेत अशा हत्तींवर हल्ला करतो. पराक्रमी पुरुषांचा हा स्वभावच असतो. त्यांच्या पराक्रम वयावर अवलंबून नसतो.

३.नाभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते मृगै:।
विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेन्द्रता॥

सिंहाचा राज्याभिषेक वा अन्य काही संस्कार प्राण्यांकडून केला जात नाही. पराक्रमाने राज्य मिळविलेल्या त्याचे प्राण्यांवरील राज्य स्वयंसिद्ध असते.

वगैरे वगैरे.

सिंह या विषयावरील मराठी पुस्तके

प्रतिमा

सिंह हे दुर्गामातेचे वाहन आहे
सिंह हे दुर्गामातेचे वाहन आहे
होयसाल या प्राचीन राज्याच्या प्रतीकामधील सिंह
होयसाल या प्राचीन राज्याच्या प्रतीकामधील सिंह
या नाण्यावर सिंहाची प्रतिमा आहे
या नाण्यावर सिंहाची प्रतिमा आहे
गीर जंगलात उन्हामध्ये ऊब घेणारा एक नर सिंह
गीर जंगलात उन्हामध्ये ऊब घेणारा एक नर सिंह
गीर जंगलात फिरणारा हा आशियाई सिंह
गीर जंगलात फिरणारा हा आशियाई सिंह
पंधरा सिंह
पंधरा सिंह
आफ्रिकन सिंह आळस देताना
आफ्रिकन सिंह आळस देताना
आफ्रिकन सिंह आणि तरस
आफ्रिकन सिंह आणि तरस
चार आफ्रिकन सिंहिणी, एका रानम्हशीची शिकार केल्यावर
चार आफ्रिकन सिंहिणी, एका रानम्हशीची शिकार केल्यावर
छाव्याबरोबरचा आफ्रिकन सिंह
छाव्याबरोबरचा आफ्रिकन सिंह
झाडांवर मूत्रपिंड करून त्याचे क्षेत्र चिन्हांकित आशियाई शेर
झाडांवर मूत्रपिंड करून त्याचे क्षेत्र चिन्हांकित आशियाई शेर

संदर्भ

बाह्य दुवे