Jump to content

"सलीम मुल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सलीम मुल्ला हे एक बालसाहित्यकार आहेत. सलीम मुल्ला यांचे आईवडील...
(काही फरक नाही)

१०:४३, ३ जुलै २०१९ ची आवृत्ती

सलीम मुल्ला हे एक बालसाहित्यकार आहेत.

सलीम मुल्ला यांचे आईवडील दोघेही शिक्षक. नोकरीची ठिकाणे कोल्हापूरच्या डोंगराळ परिसरातील, आणि नेहमी बदलणारी. अशा गावांमध्ये राहून माध्यमिक शाळेत शिकणारा सलीम निसर्गावर कविता, बालकथा लिहू लागला. निसर्ग वाचन करू लागला. किशोर वयात सलीम यांच्या हाती [व्यंकटेश माडगूळकर]],मारुती चित्तमपल्ली अशा निसर्गाशी एकरूप झालेल्या प्रथितयश लेखकांची पुस्तके पडली. माडगूळकरांचा निसर्गाकडे पाहण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन, चित्तमपल्लींचे थक्क करणारे निसर्गवाचन यामुळे सलीम यांचे निसर्गप्रेम आणखी दृढ होत गेले. अश्यावेळी वडिलांचे बालसाहित्यिक असलेले मित्र विठ्ठल कृष्णा सुतार यांनी सलीम मुल्ला यांना लिहिण्यासाठी प्रेरणा दिली.

सलीम मुल्ला यांनी २००२ साली ‘अवलिया’ हे ललित लेखनाचे पुस्तक लिहिले; चोखंदळ वाचकांनी त्याला दाद दिली.

पुढॆ सलीम यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका घेतल्यानंतर ‘इंटिरिअर डेकोरेटिव्ह डिझाइन’ मधून पदवी मिळवली. परंतु त्यांना सुरुवातीपासून निसर्गाची आवड असल्याने त्यांनी वन विभागात नोकरी मिळवली. निसर्गात भटकंती करताना आलेले वैशिष्टय़पूर्ण, कुतूहल वाढवणारे, नवलाईचे काहीसे चमत्कारिक अनुभव शब्दबद्ध करण्याचा त्यांना ध्यास लागला. आणि त्यांचे त्यांचे निसर्गाला कवेत घेणाऱ्या कविता, बालकथा, ललित लेख, वृत्तपत्रीय लेख असे विविधांगी लेखन सुरू झाले.

सलीम मुल्ला यांनी लिहिलेली पुस्तके

  • अजबाईतून उतराई (बालकादंबरी)
  • अवलिया (ललित लेखसंग्रह)
  • जंगल खजिन्याचा शोध (बालकादंबरी)
  • प्रेरणा आणि चिकाटी (बालकादंबरी)

सन्मान आणि पुरस्कार

  • सलीम मुल्ला यांना दिल्लीतील साहित्य अकादमीचा २०१९ सालचा 'युवा साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाला आहे.