"गो.मा. पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
गो. मा. पवार (जन्म : |
गो. मा. पवार (जन्म : पानगाव-सोलापूर जिल्हा, १३ मे १९३२; मृत्यू : १६ एप्रिल २०१९) हे एक मराठी साहित्य समीक्षक व [[विठ्ठल रामजी शिंदे|महर्षी विठ्ठल रामजी शिंदे]] यांचे चरित्रकार आहेत. साहित्यमूल्य आणि अभिरुची, विनोद: तत्त्व आणि स्वरूप, ही त्यांची मुख्य पुस्तके आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'महर्षी विट्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य' या चरित्राला २००७ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला. |
||
==शिक्षण== |
|||
गो.मा. पचार ह्यांचे शालेय शिक्षण नरखेड येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेमधून झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून मराठी विषय घेऊन एम.ए. व औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी केले. त्यानंतर ३३ वर्षे ते विविध महाविद्यालयांत प्राध्यापक होते. अमरावतीचे सरकारी महाविद्यालय, औरंगाबाद विद्यापीठ व कोल्हापूर विद्यापीठ येथे त्यांनी अध्यापन कार्य केले. १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोलापूर यथे राहून त्यांनी विपुल साहित्य लिहिले. |
|||
मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर गोमांनी खूप काम केले. त्यांनी १६ ग्रंथाचे लेखन केले असून ६० शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. विद्यार्थिप्रिय प्राध्यापक असलेल्या 'गोमां'च्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. |
|||
==गो.मा. पवार यांनी लिहिलेली पुस्तके== |
==गो.मा. पवार यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* द लाइफ ॲन्ड वर्क्स ऑफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (इंग्रजी) |
|||
* निवडक मराठी समीक्षा |
* निवडक मराठी समीक्षा |
||
* निवडक विठ्ठल रामजी शिंदे |
* निवडक विठ्ठल रामजी शिंदे |
||
ओळ ७: | ओळ १३: | ||
* मराठी विनोद : विविध आविष्काररूपे |
* मराठी विनोद : विविध आविष्काररूपे |
||
* महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य |
* महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य |
||
* महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – समग्र वाड्मय खंड १ व २ |
|||
* विनोद : तत्त्व आणि स्वरूप |
* विनोद : तत्त्व आणि स्वरूप |
||
* साहित्यमूल्य आणि अभिरुची, |
* साहित्यमूल्य आणि अभिरुची, |
१७:४८, १६ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
गो. मा. पवार (जन्म : पानगाव-सोलापूर जिल्हा, १३ मे १९३२; मृत्यू : १६ एप्रिल २०१९) हे एक मराठी साहित्य समीक्षक व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार आहेत. साहित्यमूल्य आणि अभिरुची, विनोद: तत्त्व आणि स्वरूप, ही त्यांची मुख्य पुस्तके आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'महर्षी विट्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य' या चरित्राला २००७ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
शिक्षण
गो.मा. पचार ह्यांचे शालेय शिक्षण नरखेड येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेमधून झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून मराठी विषय घेऊन एम.ए. व औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी केले. त्यानंतर ३३ वर्षे ते विविध महाविद्यालयांत प्राध्यापक होते. अमरावतीचे सरकारी महाविद्यालय, औरंगाबाद विद्यापीठ व कोल्हापूर विद्यापीठ येथे त्यांनी अध्यापन कार्य केले. १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोलापूर यथे राहून त्यांनी विपुल साहित्य लिहिले.
मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर गोमांनी खूप काम केले. त्यांनी १६ ग्रंथाचे लेखन केले असून ६० शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. विद्यार्थिप्रिय प्राध्यापक असलेल्या 'गोमां'च्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे.
गो.मा. पवार यांनी लिहिलेली पुस्तके
- द लाइफ ॲन्ड वर्क्स ऑफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (इंग्रजी)
- निवडक मराठी समीक्षा
- निवडक विठ्ठल रामजी शिंदे
- भारतीय साहित्याचे निर्माते विठ्ठल रामजी शिंदे
- मराठी विनोद : विविध आविष्काररूपे
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – समग्र वाड्मय खंड १ व २
- विनोद : तत्त्व आणि स्वरूप
- साहित्यमूल्य आणि अभिरुची,
- सुहृद आणि संस्मरणे
पुरस्कार
- साहित्य अकादमी पुस्कार - २००७
- डाॅ. व.दि. कुलकर्णी स्मृति पुरस्कार