"दामोदर सावळाराम यंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: दामोदर सावळराम यंदे हे मुंबईतील एक पुस्तक प्रकाशक होते. दामोदर स... |
(काही फरक नाही)
|
२१:४६, १२ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
दामोदर सावळराम यंदे हे मुंबईतील एक पुस्तक प्रकाशक होते. दामोदर सावळाराम आणि मंडळी ही त्यांची प्रकाशन संस्था. या संस्थेने अनेक धार्मिक, सामाजिक आणि वेदवाङ्मयावर आधारित पुस्तके प्रकाशित केली. प्रकाशित पुस्तकांची एक छोटीशी यादी पाहिली की त्यांनी केलेल्या प्रचंड कामाचा प्रत्यय यावा. यंदे हे स्वत: लेखकही होते.
दामोदर सावळाराम आणि मंडळी यांनी प्रकाशित केलेली पुस्तके
- अबलोेन्नती लेखमाला (समग्र) - चिंतामण विनायक वैद्य).
- अभंग व पदें (उदासी हरिहर महाराज)
- अमीर अबदुल रहिमान (वि.को. ओक)
- अर्वाचीन कविता (पूर्वार्ध-चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे)
- नरसिंह मेहेता (दा.ना. आपटे
- ब्रह्मचर्य हेंच जीवन वीर्यनाश हाच मृत्यु - शिवानंद (वडूजकर)
- भगवद्गीता सान्वय, सार्थ, सटीक, संस्कृत-मराठी, वामनी सश्लोक, मोरापंती आर्या, तुकाराम अभंग, मुक्तेश्वरी ओवी, उद्धवचिद्घन, सवाईसहित (संपादक - कृष्णराव अर्जुन केळूसकर) .
- श्रीमद्भागवत : भाग २, स्कंध २-३; भाग ३, स्कंध ४; भाग ५, स्कंध ७-८; भाग ६, स्कंध ९; भाग ७, स्कंध १० (पूर्वार्ध); भाग ८, स्कंध १0 (उत्तरार्ध)
- भागवत कळसरूपी शेवटचा भाग ६वा + सुलभ सुभाषित संग्रह + भागवतस्वारस्य सूचि पौराणिक कोश (जोगळेकरशास्त्री, के.ल. ओगले, चिं.ग. भानू, गोडसे, साधले, निगळे, घघवे, भावे,बडोदेकर).
- भारतीय समाजस्थिती (वि.पां दांडेकर)
- सार्थ-सटीप महाभारत-भीष्म पर्व: पूर्वार्ध : अध्याय १ ते ५८) - नरहर गणेश जोशी)
- महाराष्ट्र कवि चरित्र भाग १, २. (ज.र. अजगावकर)
- मुण्डकोपनिषत् शांकरभाष्य मराठी भाषांतरासहित : माध्व रंगरामानुज यांच्या संस्कृत परीक्षणासहित (चिंतामण गंगाधर भानु)
- मुंबई इलाख्याचे प्रसिद्ध गव्हरनर मौंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन साहेब यांचे चरित्र (पूर्वार्ध) - कृष्णाजी बल्लाळ गोडबोले)
- बृहद् योगवासिष्ठसार-भाग १, २, ३. (विष्णु वामन बापट)
- श्रीकृष्णमाहात्म्य (दा.सा. यंदे)
- स्वामी चिदानंद अथवा प्रस्तुत चळवळीचे प्रतिबंध (रामचंद्र नरगुंदकर)
(अपूर्ण)
.