"तिथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ६४: | ओळ ६४: | ||
चतुर्थी, षष्टी, अष्टमी, नवमी, द्वादशी व चतुर्दशी या तिथींना रंध्रतिथी किंवा पक्षरंध्रा तिथी वा पक्षाच्छिद्रा म्हणतात. त्या शुभकार्याला वर्ज्य मानतात. |
चतुर्थी, षष्टी, अष्टमी, नवमी, द्वादशी व चतुर्दशी या तिथींना रंध्रतिथी किंवा पक्षरंध्रा तिथी वा पक्षाच्छिद्रा म्हणतात. त्या शुभकार्याला वर्ज्य मानतात. |
||
==द्विपुष्कर आणि त्रिपुष्कर योग== |
|||
भद्रा तिथीच्या दिवशी, म्हणजेच द्वितीया, सप्तमी वा दशमी या तिथीच्या दिवशी जर रविवार, मंगळवार किंवा शनिवार आला की चंद्रनक्षत्रानुसार द्विपुष्कर किंवा त्रिपुष्कर योग होतो. |
|||
धनिष्ठा, चित्रा किंवा मृग नक्षत्रात चंद्र असेल तर द्विपुष्कर योग आणि कृतिका, पुनर्वसु, विशाखा, उतराफाल्गुनी, उत्तराषाढ़ा वा उत्तराभाद्रपद नक्षत्रात असेल तर त्रिपुष्कर योग होतो. |
|||
द्विपुष्कर योगामध्ये ज्या शुभ कार्याची सुरुवात होते त्याची पुनरावृत्ती होते. हा योग चालू असताना ज्या शुभाशुभ घटनेची समाप्ती होते ती कालान्तराने दुप्पट होते, असे शास्त्र सांगते. म्हणून या काळात धन-संपत्तीविषयक शुभ काम करावे, श्राद्धादी अशुभ कार्य करू नये. |
|||
द्विपुष्कर किंवा किंवा त्रिपुष्कर योग चालू असताना मृताची अंत्येष्टी करू नये, असे सांगितले जाते. |
|||
११:२३, १९ मार्च २०१९ ची आवृत्ती
तिथी हे हिंदू कालगणनेचे एक परिमाण आहे. एका चांद्रमासात ३० तिथी येतात. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष होय आणि पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष होय. अशा या दोन पक्षांचा (पंधरवड्यांचा) एक मास (महिना) होतो. शुक्लपक्षालाच शुद्धपक्ष आणि कृष्ण पक्षाला वद्य पक्ष म्हणतात.
उत्तर भारतात महिन्यातला कृष्णपक्ष आधी येतो आणि मग शुक्लपक्ष.
तिथीचे मापन
एका विशिष्ट वेळी चंद्र आणि सूर्य एकत्र आले की अमावस्या होते. चंद्र व सूर्य एकत्र आल्यानंतर चंद्र जलद गतीने सूर्याच्या पुढे जातो. सूर्य व चंद्र यांच्यात १२ अंशाचे अंतर झाले की प्रतिपदा होते. अशाप्रकारे दर १२ अंशापासून नवीन तिथी चालू होते.
तिथींची नावे
१.प्रतिपदा, २.द्वितीया, ३.तृतीया, ४.चतुर्थी, ५.पंचमी, ६.षष्ठी, ७.सप्तमी, ८.अष्टमी, ९.नवमी, १०.दशमी, ११.एकादशी, १२.द्वादशी, १३.त्रयोदशी, १४.चतुर्दशी, १५.पौर्णिमा, १६.अमावस्या.
तिथींचे गट
वर दिलेल्या १६ तिथ्यांचे वर्गीकरण याप्रमाणे :-
नंदा तिथी = प्रतिपदा, षष्टी आणि एकादशी
भद्रा तिथी = द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी
जया तिथी = तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी
रिक्ता तिथी = चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी
पूर्णा तिथी = पंचमी, दशमी, पौर्णिमा आणि अमावस्या
सिद्धा तिथी
नंदा, भद्रा, जया, रिक्ता व पूर्णा या तिथ्या विवक्षित वारी आल्या की अतिशुभफलदायक होतात, अशी कल्पना आहे. म्हणून त्यांना त्या दिवशी सिद्धा तिथी म्हणतात. त्या तिथी आणि त्यांचे वार अनुक्रमे :
नंदा तिथी - शुक्रवार
भद्रा तिथी - बुधवार
जया तिथी - मंगळवार
रिक्ता तिथी - शनिवार
पूर्णा तिथी - गुरुवार
शून्यतिथी
प्रत्येक महिन्यात काही तिथ्यांना शून्यतिथी म्हणतात. या तिथ्यांना कोणतेही शुभ कार्य करू नये असे पंचांग सांगते. त्या तिथ्या अश्या -
चैत्र महिना - शुक्ल/कृ्ष्ण अष्टमी, नवमी.
वैशाख महिना - शुक्ल/कृ्ष्ण द्वादशी
ज्येष्ठ महिना - शुक्ल त्रयोदशी, कृष्ण वतुर्दशी
आषाढ महिना - शुक्ल षष्ठी, कृष्ण सप्तमी
श्रावण महिना - शुक्ल/कृष्ण द्वितीया, तृतीया
भाद्रपद महिना - शुक्ल/कृ्ष्ण प्रतिपदा, द्वितीया
आश्विन महिना - शुक्ल/कृ्ष्ण दशमी, एकादशी
कार्तिक महिना - शुक्ल चतुर्दशी, कृष्ण पंचमी
मार्गशीर्ष महिना - शुक्ल/कृ्ष्ण सप्तमी, अष्टमी
पौष महिना - शुक्ल/कृ्ष्ण चतुर्थी, पंचमी
माघ माहिना - शुक्ल पंचमी, कृष्ण षष्ठी
फाल्गुन महिना - शुक्ल तृतीया, कृष्ण चतुर्थी
पर्व तिथी
या तिथ्या मंगलकार्यासाठी अशुभ समजल्या जातात. पर्व तिथ्यांची यादी :-
- पौर्णिमा
- कृष्ण अष्टमी, चतुर्दशी. अमावास्या.
- सूर्याच्या राशी संक्रमणावेळची तिथी.
रंध्रतिथी
चतुर्थी, षष्टी, अष्टमी, नवमी, द्वादशी व चतुर्दशी या तिथींना रंध्रतिथी किंवा पक्षरंध्रा तिथी वा पक्षाच्छिद्रा म्हणतात. त्या शुभकार्याला वर्ज्य मानतात.
द्विपुष्कर आणि त्रिपुष्कर योग
भद्रा तिथीच्या दिवशी, म्हणजेच द्वितीया, सप्तमी वा दशमी या तिथीच्या दिवशी जर रविवार, मंगळवार किंवा शनिवार आला की चंद्रनक्षत्रानुसार द्विपुष्कर किंवा त्रिपुष्कर योग होतो.
धनिष्ठा, चित्रा किंवा मृग नक्षत्रात चंद्र असेल तर द्विपुष्कर योग आणि कृतिका, पुनर्वसु, विशाखा, उतराफाल्गुनी, उत्तराषाढ़ा वा उत्तराभाद्रपद नक्षत्रात असेल तर त्रिपुष्कर योग होतो.
द्विपुष्कर योगामध्ये ज्या शुभ कार्याची सुरुवात होते त्याची पुनरावृत्ती होते. हा योग चालू असताना ज्या शुभाशुभ घटनेची समाप्ती होते ती कालान्तराने दुप्पट होते, असे शास्त्र सांगते. म्हणून या काळात धन-संपत्तीविषयक शुभ काम करावे, श्राद्धादी अशुभ कार्य करू नये.
द्विपुष्कर किंवा किंवा त्रिपुष्कर योग चालू असताना मृताची अंत्येष्टी करू नये, असे सांगितले जाते.