Jump to content

"अनंत कान्हेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७: ओळ ३७:
* {{संकेतस्थळ|http://bombayhighcourt.nic.in/libweb/historicalcases/cases/Nasik_Conspiracy_Case_-1910.html|मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळ - इ.स. १९१० सालातील नाशिक कटाच्या खटल्याची माहिती|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://bombayhighcourt.nic.in/libweb/historicalcases/cases/Nasik_Conspiracy_Case_-1910.html|मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळ - इ.स. १९१० सालातील नाशिक कटाच्या खटल्याची माहिती|इंग्लिश}}
* अनंत कान्हेरे (मराठी पुस्तक, प्रकाशक - आपलं प्रकाशन )
* अनंत कान्हेरे (मराठी पुस्तक, प्रकाशक - आपलं प्रकाशन )
* क्रांतिवेदीवरील समिधा (प्रकरण ६) (दुर्गेश परुळकर, अक्षयविद्या प्रकाशन )


{{DEFAULTSORT:कान्हेरे, अनंत}}
{{DEFAULTSORT:कान्हेरे, अनंत}}

२३:१७, १४ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

अनंत कान्हेरे

अनंत कान्हेरे यांना फासावर नेताना
जन्म: इ.स. १८९१
मृत्यू: एप्रिल १९, इ.स. १९१०
ठाणे, महाराष्ट्र, भारत (फाशी)
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अभिनव भारत
धर्म: हिंदू
प्रभाव: विनायक दामोदर सावरकर
वडील: लक्ष्मण कान्हेरे

अनंत लक्ष्मण कान्हेरे (जन्म : आयनी मेटे, रत्‍नागिरी जिल्हा, इ.स. १८९१; मृत्यू : ठाणे, १९ एप्रिल १९१०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.

सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.

जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये 'शारदा' या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.

ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे. नाशिकमध्ये 'अनंत कान्हेरे' नावाचे क्रिकेटचे मैदान आहे.

बाह्य दुवे

  • http://www.marathimati.com/entertainment/movies/1909-preview/. Missing or empty |title= (सहाय्य)[मृत दुवा]
  • मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळ - इ.स. १९१० सालातील नाशिक कटाच्या खटल्याची माहिती (इंग्लिश मजकूर)
  • अनंत कान्हेरे (मराठी पुस्तक, प्रकाशक - आपलं प्रकाशन )
  • क्रांतिवेदीवरील समिधा (प्रकरण ६) (दुर्गेश परुळकर, अक्षयविद्या प्रकाशन )