"सागरमंथन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Kiran Jawale (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
विष्णुपुराणातल्या एका कथेनुसार एकदा देवांचा राजा इन्द्र कोठूनतरी वैकुंठ लोकाला परत येत होते. त्याचवेळी दुर्वास ऋषी वैकुंठातून बाहेर पडत होते. दुर्वासाने ऐरावत हत्तीवर बसलेल्या इंद्राला पहिले आणि त्याला विष्णू समजून त्याच्या दिशेने एक फुलांची माळ फेकली. परंतु आपल्याच धुंदीत असलेल्या इंद्राने ती माळ ऐरावताच्या डोक्यावर फेकली. ऐरावतीने डोके झटकून ती माळ जमिनीवर पाडली आणि ती त्याच्या पायाखाली आली. |
|||
सागरमंथनच्या वेळी इंद्र देव व राक्षसांना घेऊन आले |
|||
⚫ | |||
दुर्वास ऋषींनी हे पाहिले, ते संतप्त झाले आणि त्यांनी इंद्राला 'तुझे सर्व वैभव नष्ट होऊन समुद्रात पडेल आणि तुझे दानवांशी युद्ध होऊन त्यात तू हरल्यावर स्वर्गाचे राज्य गमावशील' असा शाप दिला. |
|||
आपले वैभव नष्ट झाल्यावर इंद्रदेव इतर सर्व देवांना घेऊन भगवान विष्णूंकडे गेला आणि आपले वैभव परत मिळण्यासाठी काय करावे याचा सल्ला विचारला. विष्णूने समुद्रमंथन करून संपूर्ण वैभव वापस परत मिळवावे आणि सागरमंथनातून अमृत प्राप्त करून घेऊन त्याचा उपभोग करावा असा मार्ग सुचवला. |
|||
सर्व देवांना हा मार्ग पसंत पडला, पण अडचण अशी होती की, दानवांची मदत घेतल्याशिवाय एकट्यांच्या जिवावर समुद्रमंथन करणे देवांना शक्य नव्हते. आणि शेवटी देव-दानवांनी मिळून समुद्रमंथन केले. |
|||
सागरमंथनाच्या वेळी इंद्र हे अन्य देवांना व दानवांना घेऊन आले |
|||
⚫ | |||
पर्वताच्या एका बाजूला देव व दुसरीकडे दानव होते. |
पर्वताच्या एका बाजूला देव व दुसरीकडे दानव होते. |
||
विष्णूने [[शेषनाग]]ाला पर्वताभोवती गुंडाळले. दॆवांनी आणि दानवांनी मंदार पर्वताला रवीसारखे फिरवत फिरवत दोन्ही बाजूंनी त्याला खेचणे सुरू केले. |
|||
काही वेळानंतर समुद्रातून [[हलाहल]] नावाचे भयंकर विष निघाले. |
काही वेळानंतर समुद्रातून [[हलाहल]] नावाचे भयंकर विष निघाले. सर्वांनी [[महादेव]]/[[शंकर]] यांना प्रार्थना केली. महादेव |
||
तेथे आल्यावर त्यांनी |
तेथे आल्यावर त्यांनी हलाहल प्राशन केले, विषामुळे त्यांच्या गळ्याची आग होऊन त्यांचा कंठ निळा झाला. |
१९:४२, ७ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती
विष्णुपुराणातल्या एका कथेनुसार एकदा देवांचा राजा इन्द्र कोठूनतरी वैकुंठ लोकाला परत येत होते. त्याचवेळी दुर्वास ऋषी वैकुंठातून बाहेर पडत होते. दुर्वासाने ऐरावत हत्तीवर बसलेल्या इंद्राला पहिले आणि त्याला विष्णू समजून त्याच्या दिशेने एक फुलांची माळ फेकली. परंतु आपल्याच धुंदीत असलेल्या इंद्राने ती माळ ऐरावताच्या डोक्यावर फेकली. ऐरावतीने डोके झटकून ती माळ जमिनीवर पाडली आणि ती त्याच्या पायाखाली आली.
दुर्वास ऋषींनी हे पाहिले, ते संतप्त झाले आणि त्यांनी इंद्राला 'तुझे सर्व वैभव नष्ट होऊन समुद्रात पडेल आणि तुझे दानवांशी युद्ध होऊन त्यात तू हरल्यावर स्वर्गाचे राज्य गमावशील' असा शाप दिला.
आपले वैभव नष्ट झाल्यावर इंद्रदेव इतर सर्व देवांना घेऊन भगवान विष्णूंकडे गेला आणि आपले वैभव परत मिळण्यासाठी काय करावे याचा सल्ला विचारला. विष्णूने समुद्रमंथन करून संपूर्ण वैभव वापस परत मिळवावे आणि सागरमंथनातून अमृत प्राप्त करून घेऊन त्याचा उपभोग करावा असा मार्ग सुचवला.
सर्व देवांना हा मार्ग पसंत पडला, पण अडचण अशी होती की, दानवांची मदत घेतल्याशिवाय एकट्यांच्या जिवावर समुद्रमंथन करणे देवांना शक्य नव्हते. आणि शेवटी देव-दानवांनी मिळून समुद्रमंथन केले.
सागरमंथनाच्या वेळी इंद्र हे अन्य देवांना व दानवांना घेऊन आले स्वत: विष्णू हे कासवाच्या रूपात मंदार पर्वताला पाठीवर घेऊन सागरतटी गेले. पर्वताच्या एका बाजूला देव व दुसरीकडे दानव होते. विष्णूने शेषनागाला पर्वताभोवती गुंडाळले. दॆवांनी आणि दानवांनी मंदार पर्वताला रवीसारखे फिरवत फिरवत दोन्ही बाजूंनी त्याला खेचणे सुरू केले. काही वेळानंतर समुद्रातून हलाहल नावाचे भयंकर विष निघाले. सर्वांनी महादेव/शंकर यांना प्रार्थना केली. महादेव तेथे आल्यावर त्यांनी हलाहल प्राशन केले, विषामुळे त्यांच्या गळ्याची आग होऊन त्यांचा कंठ निळा झाला.