Jump to content

"गीता हरवंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गीता आदिनाथ हरवंदे या प्रवासवर्णने लिहिणार्‍या एक मराठी लेखिका...
(काही फरक नाही)

१५:२७, १ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

गीता आदिनाथ हरवंदे या प्रवासवर्णने लिहिणार्‍या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी भारतातील विविध तीर्थक्षेत्रांची माहिती देणारी पुस्तके लिहिली आहेत. श्रीकृष्णाचे जिथेजिथे वास्तव्य होते त्या सर्व ठिकाणांची माहिती देणारे त्यांचे ’श्रीकृष्ण स्थलयात्रा’ हे पुस्तक विशेश प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाचा पदस्पर्श झालेली ठिकाणे भारतात आसाम, उत्तर प्रदेश, केरळ, गुजराथ, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आदी नऊ राज्यांत आहेत. या राज्यांतील ठिकाणे आणि तेथील सध्याची स्थिती या पुस्तकात वर्णन करून सांगितली आहे.

गीता हरवंदे या भावंडांमध्ये सर्वांत मोठ्या. त्यात मुलगी म्हणून जन्माला आलेली हा त्यांचा जणू गुन्हा होता. त्यामुळे त्यांची अवस्था ‘जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित’ अशी होती, असे त्यांनी एके ठिकाणी लिहिले आहे. त्यांना वाचायला, अभ्यास करायला फक्त शाळेत परवानगी होती. शाळेतून घरी आल्याबरोबर प्रथम साठलेले घरकाम करायचे आणि नंतर आईने शिवून ठेवलेल्या कपड्यांना काज-बटण-हातशिलाई करायची हे त्यांचे काम असे. शिवडीच्या कबरस्थानातील हौदावरचे पाणी मिळवण्यासाठी त्यांना जिवाचा आटापिटा करावा लागे.

गीता हरवंदे यांना त्या इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेत पहिली आल्याने बक्षीस म्हणून ‘श्यामची आई’ हे पुस्तक मिळाले. खेळातील वगैरे मिळून इतरही चार-पाच पुस्तके त्यावेळी त्यांना बक्षीस म्हणून मिळाली होती. पण ती पुस्तके वाचायला त्यांना मोठे व्हावे लागले. पुढे संसाराचा पसारा बर्‍यापैकी आवरल्यावर गीता हरवंदे यांना त्यांना बक्षीस मिळालेले ‘श्यामची आई’ उलगडण्यास उसंत मिळाली.

बालपणीच्या अशा परिस्थितीत गीता हरवंदे यांचे अक्षरांशी खेळायचे राहूनच गेले. अक्षरांच्या दालनात प्रवेश करायला त्यांना प्रौढपण यावे लागले.

गीता हरवंदे यांची पुस्तके

  • कोंकणकंठा दाभोळ
  • पेण
  • भारतीय संस्कृती
  • महाराष्ट्रातील तीर्थयात्रा
  • श्रीकृष्ण स्थलयात्रा