गीता हरवंदे
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
गीता आदिनाथ हरवंदे या एक मराठी लेखिका आहेत. या मुख्यत्वे प्रवासवर्णने लिहितात.[ संदर्भ हवा ] त्यांनी भारतातील विविध तीर्थक्षेत्रांची माहिती देणारी पुस्तके लिहिली आहेत. श्रीकृष्णाचे जिथेजिथे वास्तव्य होते त्या सर्व ठिकाणांची माहिती देणारे त्यांचे ’श्रीकृष्ण स्थलयात्रा’ हे लिहिले आहे. यात आसाम, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आदी नऊ राज्यांतील ठिकाणे आहेत.[ संदर्भ हवा ] या राज्यांतील ठिकाणे आणि तेथील सध्याची स्थिती या पुस्तकात वर्णन करून सांगितली आहे.[ संदर्भ हवा ]
हरवंदे या भावंडांमध्ये सर्वांत मोठ्या आहेत. त्यांना वाचायला, अभ्यास करायला फक्त शाळेत परवानगी होती. शाळेतून घरी आल्याबरोबर प्रथम साठलेले घरकाम करायचे आणि नंतर आईने शिवून ठेवलेल्या कपड्यांना काज-बटण-हातशिलाई करायची हे त्यांचे काम असे. त्या शिवडीच्या कबरस्थानातील हौदावरचे पाणी भरून घरी आणीत.[ संदर्भ हवा ]
हरवंदे यांना त्या इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेत पहिली आल्याने बक्षीस म्हणून ‘श्यामची आई’ हे पुस्तक मिळाले. याशिवाय त्यांना इतर चार-पाच पुस्तके बक्षीस म्हणून मिळाली होती.[ संदर्भ हवा ] ती पुस्तके त्यांनी मोठेपणी वाचली.
पुस्तके
[संपादन]- कोंकणकंठा दाभोळ[ संदर्भ हवा ]
- पेण[ संदर्भ हवा ]
- भारतीय संस्कृती[ संदर्भ हवा ]
- महाराष्ट्रातील तीर्थयात्रा[ संदर्भ हवा ]
- श्रीकृष्ण स्थलयात्रा [ संदर्भ हवा ]