"लोंझा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: औरंगाबाद जिल्ह्यात लोंझा नावाचा एक डोंगरी किल्ला आहे. किल्ल्याच... |
(काही फरक नाही)
|
११:३९, २८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
औरंगाबाद जिल्ह्यात लोंझा नावाचा एक डोंगरी किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १६०० फूट असून किल्ल्याची चढण सोपी गणली जाते. हा किल्ला अजंठा सातमाळ डोंगर रांगेत महादेव टाक नावाच्या डोंगरावर आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे त्याकाळात राजधानीकडे येणार्या मार्गांवर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली होती. यादवांचा पराभव झाल्यानंतर देवगिरीचे महत्व कमी झाले. त्यामुळे टेहळ्णीसाठी बनवलेल्या किल्ल्यांचे महत्त्वही कमी झाले व आडमार्गावर असल्यामुळे हळूहळू हे किल्ले लोकांच्या विस्मरणात गेले. त्यांतलाच लोंझा हा किल्ला आहे.
औरांगाबाद जिल्ह्यातील अंतुर किल्ल्याच्या दक्षिणेला जे खोरे आहे त्याला स्थानिक लोक "राजू खोरे" या नावाने ओळखतात. या खोर्यात "महादेव टाक" या नावाचा एक छोटा डोंगर आहे. मुख्य डोंगररांगेपासून एका खिंडीने वेगळ्या झालेल्या या डोंगरावर "लोंझा किल्ला" आजही गतकाळाची साक्ष देत उभा आहे. लोकांच्या विस्मरणात गेलेला हा सुंदर किल्ला शोधून काढण्याचे श्रेय श्री. राजन महाजन व श्री. हेमंत पोखरणकर यांच्याकडे जाते. चाळीसगाव पासून जवळ असलेला लोंझा किल्ला पाहिल्यावर एक वेगळा, सुंदर किल्ला पाहिल्याचे समाधान मिळते. किल्ला छोटेखानी आणि माफक उंचीचा असला तरी सौंदर्यवान आहे. गडावर अवशेष नाहीत, पण खूप झाडी असून एक गुहेतील मंदिर आहे. मागे बुटक्या पायर्या आहेत. गडावर आणि परिसरात हिरव्या रंगाची मुक्त पखरण असल्याने जंगलात राहण्याची हौस येथे मनमुराद भागवता येते.
खाजगी वाहनाने चाळीसगावहून अंतूर व लोंझा हे दोनही किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
महादेव टाक नावाच्या डोंगरावर असल्याने या किल्ल्याला महादेव टाक किल्ला म्हणूनही ओळखले जाते.