"सुभाष भेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ४८: | ओळ ४८: | ||
* २०१६ साली शिल्पा कांबळे यांच्या ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीला. |
* २०१६ साली शिल्पा कांबळे यांच्या ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीला. |
||
* २०१७ साली हा पुरस्कार बालिका ज्ञानदेव या कवयित्रीच्या ‘मॅग्झिनीतून सुटतेय गोळी’ या काव्यसंग्रहाला मिळाला. |
* २०१७ साली हा पुरस्कार बालिका ज्ञानदेव या कवयित्रीच्या ‘मॅग्झिनीतून सुटतेय गोळी’ या काव्यसंग्रहाला मिळाला. |
||
* २०१८ साली रश्मी कशेळकर’भुईरिंगण’ या ललित सेख संग्रहासाठी. |
|||
==सुभाष भेंडे यांचे प्रकाशित साहित्य == |
==सुभाष भेंडे यांचे प्रकाशित साहित्य == |
१२:५२, २६ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सुभाष भेंडे | |
---|---|
जन्म नाव | सुभाष भेंडे |
जन्म |
ऑक्टोबर १४, इ.स. १९३६ बोरी, गोवा |
मृत्यू |
डिसेंबर २०, इ.स. २०१० मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार |
कथा कादंबरी |
सुभाष भेंडे (ऑक्टोबर १४, इ.स. १९३६; बोरी, गोवा - डिसेंबर २०, इ.स. २०१०; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी साहित्यिक होते.
ऑक्टोबर १४, इ.स. १९३६ रोजी गोव्यातील बोरी या गावात भेंड्यांचा जन्म झाला. केपे या स्वतःच्या मूळ गावातून ते शिक्षणासाठी सांगली येथे गेले. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते. इ.स. २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे झालेल्या २१ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
डिसेंबर २०, इ.स. २०१० रोजी मेंदूतील रक्तस्रावामुळे (की हृदयविकाराच्या झटक्याने ?) त्यांचे मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या साहित्यावर प्रल्हाद वडेर यांनी ’सुभाष भेंडे यांचे साहित्यविश्व’ नामक ग्रंथ लिहिला आहे.
प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला. त्या लेखाचे पाठ्यपुस्तक मंडळाने काय हाल केले त्याची हकीकत गड्या आपुला गाव बरा येथे वाचता येईल.
पुरस्कार
प्रा. डॉ. सुभाष भेंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भेंडे कुटंबीय आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला 'सुभाष भेंडे नवोदित लेखक वाङ्मय पुरस्कार' बबन मिंडे यांच्या 'कॉमन मॅन' या कादंबरीला देण्यात आला. ११,१११ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.(२०१२).
त्यानंतरचे पुरस्कार
- २०१३ साली किरण गुरव यांना 'राखीव सावल्यांचा खेळ' या कथासंग्रहासाठी.
- २०१४ साली गणेश मतकरी यांच्या सिनेमॅटिक या समीक्षाग्रंथास
- २०१६ साली शिल्पा कांबळे यांच्या ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीला.
- २०१७ साली हा पुरस्कार बालिका ज्ञानदेव या कवयित्रीच्या ‘मॅग्झिनीतून सुटतेय गोळी’ या काव्यसंग्रहाला मिळाला.
- २०१८ साली रश्मी कशेळकर’भुईरिंगण’ या ललित सेख संग्रहासाठी.
सुभाष भेंडे यांचे प्रकाशित साहित्य
- अंधारवाटा (१९७८)
- आमचं गोय आमका जाय (१९७०)
- उद्ध्वस्त (मेनका प्रकाशन, १९८५)
- एक डोळे, सात गळे (साना पब्लिकेशन, १९८२)
- किनारा (मॅजेस्टिक प्रकाशन, १९९४)
- जिथे जातो तेथे (श्रीविद्या प्रकाशन, १९९०)
- साहित्य संस्कृती (श्रीविद्या प्रकाशन, १९९९)
- दिलखुलास (१९७५)
- द्राक्ष आणि रुद्राक्ष (श्रीविद्या प्रकाशन, १९८३)
- निवडक गंभीर आणि गंमतीदार (मॅजेस्टिक प्रकाशन, १९९०)
- नेपोलियननंतर तुम्हीच (मिनल प्रकाशन, १९८१)
- पितळी दरवाजा (श्रीविद्या प्रकाशन, १९९३)
- पैलतीर (मॅजेस्टिक, १९८२)
- फूल ना फुलाची पाकळी (१९७५)
- मार्ग सुखाचा (मॅजेस्टिक, १९८४)
- लांबलचक सावली (विश्वमोहिनी, १९८१)
- स्मितकथा (१९७३)
- स्वर्ग दोन बोटे (राधा प्रकाशन, १९८१)
- हसवेगिरी (बा. ग. ढवळे प्रकाशन, १९७८)
- हास-परिहास (अमेय प्रकाशन, १९७८)
बाह्य दुवे
- महान्यूज.कॉम - सुभाष भेंडे यांच्या निधनाचे वृत्त[मृत दुवा] (मराठी मजकूर)
- भेंडे यांच्या निधनाचे वृत्त (मराठी मजकूर)
- भेंडे (मराठी मजकूर)
- गड्या आपुला गाव बरा (मराठी मजकूर)