"बरेलवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बरेलवी''' (Barelvis) हा सुन्नी इस्लामचा एक उपपंथ आहे. उत्तर प्रदेशातील ब...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१९:२२, १५ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

बरेलवी (Barelvis) हा सुन्नी इस्लामचा एक उपपंथ आहे. उत्तर प्रदेशातील बरेली या जिल्ह्याच्या नावावरून विचारप्रवाहाला नाव मिळाले आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अहमद रजा खाँ बरेलवी (१८५६-१९२१) यांनी या इस्लामिक कायद्याची स्वतंत्र व्याख्या केली. भारत, पाकिस्तान, बांगलादेश तसेच अफगाणिस्तान या देशांत राहणारे बहुतांशी मुसलमान बरेली विचारप्रवाहाशी संबंधित आहेत.

बरेलवी या उपपंथांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार कुराण आणि हादीस हे पवित्र धर्मग्रंथच शरियतचे मूलाधार आहेत. मात्र यासाठी इमामांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे शरियतचे कायदे इमाम अबू हनीफा यांच्या विचारांनुसार आहेत. दुसरीकडे बरेलवी उपपंथाचे समर्थक आला हजरत रजा खान बरेलवी यांनी सांगितलेल्या विचारांना प्रमाण मानतात. बरेलीत आला हजरत रजा खान बरेलवी यांचा दर्गा आहे. त्यांना मानणाऱ्या समर्थकांसाठी हा दर्गा तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे.

बरेलवी विचारपंथानुसार मोहम्मद पैगंबर सर्वज्ञानी आहेत. विश्वातल्या सगळ्या सगुणनिर्गुण गोष्टींची त्यांना कल्पना आहे. ते सर्वव्यापी आहेत आणि विश्वाच्या पसाऱ्यावर त्यांची दृष्टी आहे. बरेलवी सुफी इस्लामचे अनुयायी आहेत. त्यांच्याकडे सुफी मजार म्हणजेच संतांच्या समाध्यांना विशेष महत्त्व आहे.