"इस्लाम धर्माचे संप्रदाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१: ओळ २१:


====देवबंदी आणि बरेलवी====
====देवबंदी आणि बरेलवी====
उत्तर प्रदेशातील देवबंद आणि बरेली या जिल्ह्यांच्या नावावरून विचारप्रवाहांना नाव मिळालं आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मौलाना अशरफ अली थानवी (1863-1943) आणि अहमद रजा खाँ बरेलवी (1856-1921) यांनी इस्लामिक कायद्याची स्वतंत्र व्याख्या केली. अशरफ अली थानवी देवबंदच्या दारुल-उलूम मदरशाशी संलग्न होते. तर आला हजरत अहमद रजा खाँ बरेलवी बरेलीचे होते.
मौलाना अब्दुल रशीद गंगोही आणि मौलाना कासीम ननोतवी यांनी 1866 मध्ये देवबंद मदरशाची स्थापना केली.

==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

१२:१३, ११ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

इस्लाम धर्माचे सर्व अनुयायी स्वत:ला मुसलमान म्हणवतात. मात्र इस्लामचा कायदा (फिकह) आणि इतिहास याविषयीच्या आकलनानुसार मुसलमान विविध संप्रदाय किंवा पंथांमध्ये विभागले गेले आहेत. प्रामुख्यानं मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी असे दोन प्रमुख पंथ आहेत. मात्र या दोन्ही पंथांमध्येही अनेक उपपंथ आहेत. शिया आणि सुन्नी दोन स्वतंत्र गट असले तरी अल्ला एकच आहे, यावर त्यांचं एकमत आहे. मोहम्मद अल्लाचे दूत वा प्रेषित असल्याचं हे दोन्ही पंथ मानतात.

कुराण हा ग्रंथ अल्लाची देणगी आहे यावर दोन्ही पंथांची श्रद्धा आहे. मात्र धर्मपालनाच्या विविध पद्धती तसंच पैगंबर मोहम्मद यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण यासंदर्भात दोन्ही पंथांमध्ये तीव्र मतभेद आहेत. दोन्ही पंथांचे कायदेकानूनही वेगळे आहेत.

सुन्नी

पैगंबर मोहम्मद (इ.स. ५७० - ६३२) यांनी स्वत: अनुसरलेल्या गोष्टी तसंच विचारांचं पालन करणारा पंथ अशी सुन्नी अर्थात सुन्नत गटाची ओळख आहे. एका निष्कर्षानुसार जगभरातील मुसलमानांपैकी ८० ते ८५ टक्के सुन्नी पंथीय आहेत. तर उर्वरित १५ ते २० टक्के शिया पंथाचे आहेत.

  • सुन्नी पंथानुसार पैगंबर मोहम्मद यांच्यानंतर त्यांचे सासरे हजरत अबु बकर (इ.स. ६३२-६३४) मुसलमानांचे प्रमुख झाले.
  • सुन्नी पंथ त्यांना खलिफा म्हणतो.
  • अबु बकर यांच्यानंतर हजरत उमर (इसवी सन ६३४-६४४)
  • हजरत उस्मान (इसवी सन ६४४-६५६)
  • हजरत अली (इसवी सन ६५६-६६१) हे मुसलमानांचे अनुक्रमे नेते होऊन गेले.

इस्लामच्या कायद्यानुसार सुन्नी पंथाचे चार उपगट आहेत. या चार गटांपासून स्वत:ला वेगळं राखणारा पाचवा गटही अस्तित्वात आहे. या पाच गटांच्या धर्मपालन तसंच श्रद्धांमध्ये मोठा फरक नाही. मात्र प्रत्येक गटाच्या प्रमुखानं इस्लामची संकल्पना योग्य पद्धतीनं मांडली असल्याचा त्यांचा दावा आहे. आठव्या आणि नवव्या शतकात साधारण दीडशे वर्षांमध्ये चार प्रमुख धार्मिक नेते होऊन गेले. त्यांनी इस्लामच्या कायद्याची संकल्पना स्पष्ट केली. या नेत्यांना मानणारे त्या विशिष्ट प्रवाहाचे समर्थक झाले. इमाम अबू हनीफा (इसवी सन 699-767), इमाम शाफई (इसवी सन 767-820), इमाम हंबल (इसवी सन 780-855) आणि इमाम मालिक (इसवी सन 711-795) हे त्या काळातले चार प्रमुख नेते होते.

हनफी

इमाम अबू हनीफा यांना मानणाऱ्यांना हनफी असं म्हटलं जातं. या विचारधारेचं देवबंदी आणि बरेलवी अशा गटांमध्ये विभाजन झालं आहे.

देवबंदी आणि बरेलवी

उत्तर प्रदेशातील देवबंद आणि बरेली या जिल्ह्यांच्या नावावरून विचारप्रवाहांना नाव मिळालं आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मौलाना अशरफ अली थानवी (1863-1943) आणि अहमद रजा खाँ बरेलवी (1856-1921) यांनी इस्लामिक कायद्याची स्वतंत्र व्याख्या केली. अशरफ अली थानवी देवबंदच्या दारुल-उलूम मदरशाशी संलग्न होते. तर आला हजरत अहमद रजा खाँ बरेलवी बरेलीचे होते. मौलाना अब्दुल रशीद गंगोही आणि मौलाना कासीम ननोतवी यांनी 1866 मध्ये देवबंद मदरशाची स्थापना केली.

हे सुद्धा पहा