"इस्लाम धर्माचे संप्रदाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: इस्लाम धर्माचे सर्व अनुयायी स्वत:ला मुसलमान म्हणवतात. मात्र इ...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१२:०२, ११ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

इस्लाम धर्माचे सर्व अनुयायी स्वत:ला मुसलमान म्हणवतात. मात्र इस्लामचा कायदा (फिकह) आणि इतिहास याविषयीच्या आकलनानुसार मुसलमान विविध संप्रदाय किंवा पंथांमध्ये विभागले गेले आहेत.

प्रामुख्यानं मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी असे दोन प्रमुख पंथ आहेत. मात्र या दोन्ही पंथांमध्येही अनेक उपपंथ आहेत. शिया आणि सुन्नी दोन स्वतंत्र गट असले तरी अल्ला एकच आहे, यावर त्यांचं एकमत आहे. मोहम्मद अल्लाचे दूत वा प्रेषित असल्याचं हे दोन्ही पंथ मानतात.