"माधव गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ३३: | ओळ ३३: | ||
* प्रशासनाचे पैलू, खंड २ (२०००) |
* प्रशासनाचे पैलू, खंड २ (२०००) |
||
* फाळणीचे हत्याकांड - एक उत्तरचिकित्सा (सप्टेंबर २००७) |
* फाळणीचे हत्याकांड - एक उत्तरचिकित्सा (सप्टेंबर २००७) |
||
* भारताची धर्मनिरपेक्षता-धोक्याच्या वळणावर (मूळ इंग्रजी, अनुवाद - सुजाता गोडबोले) |
|||
* भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा (जून २०१२) |
* भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा (जून २०१२) |
||
* लोकपालाची मोहिनी (जून २०११) |
* लोकपालाची मोहिनी (जून २०११) |
१९:५२, ९ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
डॉ. माधव गोडबोले (१५ ऑगस्ट, इ.स. १९३६ - ) हे एक निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत. यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पीएच्.डी. या पदव्या मिळवल्या. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला व मार्च १९९३ मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव व न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून कामे केली होती. या अगोदर, त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या शासनात मुख्य वित्तसचिव म्हणून काम केले होते. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्षही होते. याशिवाय, त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत पाच वर्षे काम केले.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, राज्याचा अर्थसंकल्प पारदर्शी व सहज समजण्याजोगा बनवण्यासाठीची एक-सदस्यीय समिती, आंध्र प्रदेश सरकारची सुशासन समिती व केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती अशा काही(यादी अपूर्ण) सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून कामे पाहिली.
आतापर्यंत त्यांनी ९ इंग्लिश आणि ११ मराठी पुस्तके लिहिली आहेत. ‘चांगले प्रशासन हा मूलभूत हक्क मानला जावा ’ यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आधारित A Quest For Good Governance (2004) या पुस्तिकेचे ते सहलेखकही आहेत. त्यांचे The Judiciary and Governnace in India हे पुस्तक जानेवारी २००९ मध्ये प्रकाशित झाले व त्यानंतर India's Parliamentary Democracy on Trial हे पुस्तक २०११ साली प्रसिद्ध झाले.
अपुरा डाव हा त्यांच्या आत्मचरित्रात्मक An unfinished innings या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. तर हिंदुस्थानच्या फाळणीवरील The Holocaust of Indian Partition - An Inquestचा फाळणीचे हत्याकांड - एक उत्तरचिकित्सा हा. हे दोन्ही मराठी अनुवाद अनुक्रमे १९९८ आणि २००७ मध्ये प्रकाशित झाले.
त्यांच्या सहा मराठी पुस्तकांत मराठी नियतकालिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले लेख संकलित करण्यात आले आहेत. या संग्रहांना ललितेतर वैचारिक लेखनासंबंधी २०११ पर्यंत चार पारितोषिके मिळाली आहेत.
गोडबोले यांच्या जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व-एक सिंहावलोकन या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार प्रदान झाला. हा त्यांना मराठी पुस्तकांबद्दल मिळालेला ६वा पुरस्कार आहे.
ग्रंथसंपदा
- The Changing Times : A Commentary on Current Affairs (2000)
- Good Governance : Never on India's Radar (2014)(मराठीत - सुशासन हे दिवास्वप्नच)
- The Holocaust of Indian Partition - An Inquest (2006) (फाळणीचे हत्याकांड : एक उत्तरचिकित्सा, सुजाता गोडबोले यांनी केलेला मराठी अनुवाद)
- India's Parliamentary Democracy on Trial (2011) (भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा, मराठी अनुवाद)
- Industrial Dispersal Policies - A Case Study oh Maharashtra (1978)
- The Judiciary and Governance in India (2009)
- Public Accountability and Transparency : Imperatives of Good Governance (2003) (मराठी अनुवाद - सार्वजनिक जबाबदारी व पादर्शकता; सुशासनाचे अत्यावश्यक घटक)
- Public Expenditure in Maharashtra - A Case for Expenditure Strategy (1989)
- A Quest for Good Governance (2004)
- Rural Employment Strategy - A quest in the Wilderness ((1990)
- Unfinished Innings : Recollections and Reflections of a Civil Servant (1996) (अपुरा डाव, मराठी अनुवाद)
- अपुरा डाव (१९९८)
- इंदिरा गांधी : एक वादळी पर्व (डिसेंबर्र २०१७)
- फाळणीचे हत्याकांड : एक उत्तरचिकित्सा
- जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व - एक सिंहावलोकन (मे २०१४)
- नव्या दिशा बदलते संदर्भ (१९९८)
- प्रशासनाचे पैलू, खंड १ (१९९९)
- प्रशासनाचे पैलू, खंड २ (२०००)
- फाळणीचे हत्याकांड - एक उत्तरचिकित्सा (सप्टेंबर २००७)
- भारताची धर्मनिरपेक्षता-धोक्याच्या वळणावर (मूळ इंग्रजी, अनुवाद - सुजाता गोडबोले)
- भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा (जून २०१२)
- लोकपालाची मोहिनी (जून २०११)
- सत्ता आणि शहाणपण (एप्रिल २००५) - लेखसंग्रह
- सार्वजनिक जबाबदारी व पादर्शकता; सुशासनाचे अत्यावश्यक घटक (२००३)
- सुशासन हे दिवास्वप्नच (२००९)
पारितोषिके
- महाराष्ट्र साहित्य परिषदेची २००० व २००४ सालची पारितोषिके - दोन मराठी लेखसंग्रहांना वैचारिक लेखनासाठी
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २०१६चा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार
- ‘द फर्ग्युसनोनियन’ या फर्ग्युसन कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून फर्ग्युसन गौरव पुरस्कार (२९-५-२०१७)